महाराष्ट्रात जसजसे पावसाळ्याचे दिवस सुरू होतात तसेच ऋतूचक्रातील बदलांप्रमाणेच सण-सणावार, व्रत वैकल्यांचा काळ देखील सुरू होतो. याची सुरूवात मागील महिन्यात वटपौर्णिमेपासून झाली आहे. आता जुलै महिन्यात देखील सणांची रेलचेल सुरू होणार आहे. जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात सलग 4 दिवस विविध सण-सणारंभ, व्रत येणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील आज महिन्याच्या सुरूवातीला पुढील 30-31 दिवसांत कोणकोणते सण कधी आहेत? याची वाट पाहत असाल तर आज या महिन्यांतील सणांची यादीवर एकदा लक्ष टाकायला हवेच. या वर्षी जुलै महिन्यात देवशयनी आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) पासून अंगारकी चतुर्थी (Angaraki Sankashti Chaturthi) पर्यंत अनेक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे सण समारंभ आहेत.
आज जुलै महिन्याची सुरूवात होत आहे. म्हणजेच बघता बघता 2021 या वर्षाचे निम्मे महिने संपले आहेत. अद्याप कोरोनाचं सावट पूर्णपणे शमलेले नाही त्यामुळे पुढील काही दिवसांत सण समारंभ असले तरीही आपल्याला सार्यांनाच ते अगदी साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार असल्याने या सणांचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात करण्याऐवजी खाजगी स्वरूपातच करावे. अद्यापही राज्यातही प्रार्थनास्थळं बंद असल्याने नागरिकांना घरीच राहून सारे सण साजरे करावे लागतील. नक्की वाचा: July 2021 Bank Holidays: जुलै महिन्यात या दिवशी असतील बँका बंद; पहा संपूर्ण यादी.
जुलै 2021 मधील महत्त्वाचे सण आणि व्रत-वैकल्यं
5 जुलै - योगिनी एकादशी
20 जुलै - देवशयनी आषाढी एकादशी
21 जुलै - बकरी ईद
22 जुलै - महाराष्ट्रीय बेंदूर
23 जुलै - गुरूपौर्णिमा
27 जुलै - अंगारक संकष्ट चतुर्थी
यंदा 11 जुलै पासून आषाढ महिन्याला सुरूवात होत आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या उत्तरार्धात सणांची चंगळ आहे. वारकर्यांसाठी, विठू माऊलीच्या भक्तांसाठी खास असलेली आषाढी यंदा 20 जुलै दिवशी आहे. पण वारीवर यंदा बंधनं आहेत. तर गणेशभक्तांसाठी देखील हा जुलै महिना खास आहे. या महिन्यात सहा महिक्यातून एकदा येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी देखील 27 जुलै 2021 दिवशी आहे.