July 2021 Bank Holidays: जुलै महिन्यात या दिवशी असतील बँका बंद; पहा संपूर्ण यादी
Bank Holiday | Representational Image (Photo Credits: PTI)

जुलै (July) महिन्यातील बँक हॉलिडेज (Bank Holidays) भारतीय रिझर्व्हे बँकेने (Reserve Bank of India) जाहीर केले आहेत. या दिवशी सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद असणार आहेत. यात दुसरा आणि चौथा शनिवार यांचाही अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळेच जुलै महिन्यात बँकांची कामे वेळीच उरकून घ्या. सुट्ट्यांचे दिवस पाहून कामाचे नियोजन करा. कारण जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाईन सेवा सुरु राहतील. दरम्यान, सुट्टया या सणवार पाहून देण्यात आलेल्या असल्याने विविध राज्यात किंवा बँकेनुसार यात बदल होऊ शकतात.

आरबीआय (RBI) नुसार, बँकांच्या सुट्टया या तीन भागात विभागल्या गेल्या आहेत- 1. नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स एक्ट (Holiday under Negotiable Instruments Act). 2. Holiday under Negotiable Instruments Act and Real-Time Gross Settlement Holiday. 3. बँक क्लोजिंग अकाऊंट (Banks’ Closing of Accounts). (Alert! तीन दिवसानंतर बदलणार 'या' बँकेचे IFSC कोड, त्वरित बँकेला संपर्क करा)

जुलै महिन्यातील बँक हॉलिडेज:

शनिवार-रविवारी येणाऱ्या सुट्ट्या:

# 4 जुलै- रविवार

# 10 जुलै - दूसरा शनिवार

# 11 जुलै - रविवार

# 18 जुलै - रविवार

# 24 जुलै - चौथा शनिवार

# 25 जुलै - रविवार

तारीख वार सुट्ट्या
12 जुलै 2021 सोमवार कांग रथयात्रा
13 जुलै 2021 मंगळवार भानू जयंती
14 जुलै 2021 बुधवार Drukpa Tshechi
16 जुलै  2021 शुक्रवार Harela
17 जुलै 2021 शनिवार खार्ची पूजा
19 जुलै 2021 सोमवार Guru Rimpoche’s Thungkar Tshechu
20 जुलै 2021 मंगळवार बकरी ईद
21 जुलै 2021 बुधवार बकरी ईद
31 जुलै 2021 शनिवार Ker Puja

सुट्ट्यांचा अंदाज घेऊन बँकांची कामं उरकल्यास गोंधळ उडणार नाही आणि गैरसोय टाळता येईल. दरम्यान, वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांचे दिवस वेगळे असू शकतात. तसंच बँकांनुसारही यात बदल होऊ शकतात.