Indian Navy Day 2019: नौदल दिन 4 डिसेंबर दिवशी का साजरा केला जातो?
Indian Navy Day 2019 (Photo Credits: File Photo)

भारतामध्ये 4 डिसेंबर दिवशी नौसेना दिन (Navy Day) साजरा केला जातो. हा दिवस ऑपरेशन ट्रायडंट याच्या लॉन्च स्मरणार्थ खास असतो. 1971 साली भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्यांसाठी या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारतीय नौसेनेकडून या दिवशी बिटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर साजरा केला जातो. हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला असतो तर भारतीय नेव्हल बॅन्ड गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब परिसरात सादर केला जातो. दरवर्षी हा दिवस विशिष्ट थीमवर सेलिब्रेट केला जातो. यंदा Indian Navy - Silent, Strong and Swift या थीमावर संपूर्ण सेलिब्रेशन आधारित असेल. जाणून घ्या भारतीय नौसेनेबद्दल काही खास गोष्टी!  

ट्रायडंट ऑपरेशन 4-5 डिसेंबरच्या संध्याकाळी पार पडले होते. या दरम्यान कराची मधील नेव्हल हेडक्वार्टर्सवर भारताकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये 3 विद्युत क्लास मिसाईल बोट्स, 2 अ‍ॅन्टी सबमरीन्स आणि टॅन्कर्सचा समावेश होता. या हल्ल्यामध्ये सुमारे 500 पाकिस्तानी नेव्ही सैनिकांचा खात्मा करण्यात आला. तर भारताचे यामध्ये कोणतेच नुकसान झाले नाही. या Operation Trident मध्ये भारताने पहिल्यांदा अ‍ॅन्टी शिप मिसाईलचा वापर केला आहे. 1971 साली भारताच्या नौदला कडून पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला. विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तान मधील नेव्हीचं उच्चाटन करण्यात  Operation Trident ने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

ऑपरेशन ट्रायडंटनंतर ऑपरेशन पायथन या नावाने दुसरं ऑपरेशन नौसेनेकडून पार पडलं. 8-9 च्या रात्री ऑपरेशन पायथनच्या मदतीने हल्ला करण्यात आला. या नौसेनेकडून करण्यात आलेल्या दुसर्‍या हल्ल्यामध्येही भारताचे नुकसान झाले नाही.

भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, याची सुरुवात 1612 मध्ये झाली. मात्र याच्या नावात अनेकदा बदल करण्यात आले. नौसेनेचे शेवटचे नाव 26 जानेवरी, 1950 मध्ये बदलण्यात आले असून 'इंडियन नेव्ही' असे नामकरण करण्यात आले.