Holi 2021 Easy Rangoli Designs: होळी च्या दिवशी दारासमोर काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन 
Photo Credit: YouTube

रांगोळी (Rangoli) ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.[१] भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते.प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे.रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.कोणताही शुभ दिवस असो किंवा सण दाराभोवती काढलेले रांगोळी नेहमीच शुभ मानली जाते.

उद्या आपण सर्व होळी हा सण साजरा करणार आहोत.वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण जशी निसर्गात नवचैतन्याची, रंगांची बरसात करत असतो तशीच आनंदाच्या, सुखाच्या क्षणांची बरसात तुमच्या आमच्या आयुष्यात व्हावी यासाठी होळी साजरी केली जाते. या दिवशी दारासमोर,अंगणात काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत.

होळी स्पेशल रांगोळी 

चाळणीने काढता येणारी मल्टी कलर रांगोळी 

चमच्याचा वापर करुन काढलेली रांगोळी 

हॅप्पी होळी स्पेशल रांगोळी डिझाईन 

हाताच्या पंजाचा वपर करुन काढलेले सोपी रांगोळी 

पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, देवी होलिकेने आपल्याला मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केल्याने ती अग्नित जळून खाक झाली. माणसातील या वाईट गुणाचा नाश व्हावा म्हणून देशभरात होलिका दहन केले आहे.तेव्हा यंदा होळी च्या दिवशी आम्ही दाखवलेल्या या सोप्या रांगोळी डिझाईन्स नक्की काढून बघा.