Holashtak 2021: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचं होळी सणाची उत्सुकता असते. शास्त्रानुसार, फाल्गुन शुक्ल अष्टमी ते होलिका दहन (Holika Dahan) या काळाला होलाष्टक (Holashtak) म्हणतात. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक साजरा केला जातो. या काळाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये होळीची तयारी सुरू होते. यावेळी होलाष्टक 22 मार्च ते 28 मार्च दरम्यान असेल.
होलाष्टकचा काळ भक्तीच्या सामर्थ्याचा परिणाम दर्शवितो. या काळात तप करणे महत्त्वपूर्ण ठरते. जेव्हा होलाष्टक सुरू झाल्यानंतर झाडाची फांद्या तोडून त्या जमिनीवर लावल्या जातात. त्यात रंगीबेरंगी कपड्यांचे तुकडे बांधले जातात. हे भक्त प्रल्हादाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, ज्या ठिकाणी होलिका दहनसाठी झाडाची फांदी तोडून ती जमिनीवर लावली जाते, त्याठिकाणी होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. (वाचा - Holi 2021: यंदाची होळी असेल खास; ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होत आहेत शुभ योग, जाणून घ्या सविस्तर)
होलाष्टकमध्ये काय करू नये?
होलाष्टकच्या 8 दिवसात कोणतेही शुभ कार्य करणे शुभ मानले जात नाही. या काळात विवाह, भूमि पूजन, गृह प्रवेश, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन काम करणे टाळले पाहिजे. धर्मग्रंथानुसार, होलाष्टक सुरू झाल्यावर नामकरण, गृह प्रवेश, विवाह विधी अशी शुभ कार्ये केली जात नाहीत.
होलाष्टकमध्ये काय करावे?
होलाष्टक हा आठ दिवसांचा उत्सव आहे. होलाष्टक काळात जास्तीत-जास्त जप करावा. अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या या काळाला होलाष्टक असं म्हणतात. होळीपूर्वी होलाष्टकचा कालावधी येत असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने होलाष्टक अशुभ मानला जातो. परंतु, यामागे काही वैज्ञानिक कारणांचादेखील संबंधित असतो.