
Happy Narali Purnima 2020 Marathi Wishes: महाराष्ट्रामध्ये श्रावण पौर्णिमा (Shravani Purnima) हा सण नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून साजरा केला जातो. कोळी बांधवांसाठी खास असणारा हा सण यंदा राज्यामध्ये 3 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. सूर्याचा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश झाला की पावसाला सुरूवात होते. दरम्यान पूर्वी निसर्गचक्राच्या नियमंनुसार, सर्वसाधारण पणे श्रावण पौर्णिमेपर्यंत मुसळधार पाऊस पडतो. त्यानंतर तो ओसरतो. परिणामी मच्छिमार्यांसाठी श्रावणी पौर्णिमेनंतर पुन्हा समुद्रामध्ये जाण्याची संधी असते, मासेमारी पुन्हा सुरू होते. या शुभ कार्याची सुरूवात समुद्राला नारळ अर्पण केली जाते. त्यामुळेच त्याला नारळी पौर्णिमा देखील म्हटले जाते. मग यंदा उधाणलेल्या समुद्राला शांत करत, कोळी बांधवांच्या मासेमारीला पुन्हा सुरूवात करून देणारा हा सण उत्साहात, जल्लोषात साजारा करण्यासाठी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबूकवर खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छा, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र पाठवून करू शकता. यासाठी लेटेस्टली टीम कडून बनवण्यात आलेली ही नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग़्स, HD Images, Wallpapers शेअर देऊन देखील करू शकता.
कोरोना संकटकाळात सध्या सार्वजनिक स्वरूपात सण साजरा करण्यावर बंदी आहे. लोकांना फार मोठ्या संख्येने एकत्र येणं, नाच-गाण्याचा आनंद घेणं यावर बंदी असल्याने घरामध्येच राहून तुम्ही नारळी पौर्णिमेचा आनंद द्विगुणित करू शकता. त्यासाठी ही शुभेच्छापत्र शेअर करायला विसरू नका.
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

सण जिव्हाळ्याचा
दिवस आज नारळी पौर्णिमेचा!
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सण आज आला नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा!
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवचा...
मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा मासेमारी व्यवसायावर अवलंबून असतो. पावसाळ्याच्या चार महिन्यात तो ठप्प असल्याने नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या वरूण देवतेला नमस्कार करून सोन्याचा नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते. दरम्यान यावेळेस सागरा! शांत हो, तुफान वादळापासून आमचं रक्षण करा अशी प्रार्थना करून सागरदेवतेची पूजा केली जाते. सजवलेल्या बोटी समुद्रामध्ये ढकलल्या जातात. साज श्रृंगार करून या दिवशी कोळी बांधव, महिला नृत्य देखील करतात. जेवणात नारळापासून बनवलेल्या गोडा-धोडाच्या पदार्थांचा बेत असतो.