Narali Purnima 2019: खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी, त्याच्यापुढे नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima). नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी तसेच समुद्र किनारी राहणा-या लोकांसाठी विशेष मानला जातो. ज्या समुद्रामुळे आपला उदरनिर्वाह चालतो त्याची मनोभावे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. या दिवशी समुद्राला सोन्याचा नारळ किंवा नारळ अर्पण करुन कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. Narali Purnima 2019 Wishes: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा श्रावणी पौर्णिमा
त्यानंतर कोळी बांधव आपल्या होड्या घेऊन समुद्रात मासेमारीही करायला जातात. पौर्णिमेला समुद्राला भरती अधिक प्रमाणात असते. म्हणून मासेमारी करताना समुद्राला आपल्या संरक्षणासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थांसोबतच गोड नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन ही नारळी पौर्णिमेचा उत्साह आणखी द्विगुणित करा.Narali Purnima 2019: श्रावणी पौर्णिमेदिवशी नारळी पौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा समुद्र पूजनाचा शुभ मुहूर्त काय?
नारळी पौर्णिमा शुभेच्छासंदेश व्हिडिओ
सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. म्हणजेच नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे वरुणदेवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुणदेवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो.