Narali Purnima 2019: महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima). मुंबापुरीसह, समुद्र किनारपट्टी जवळ भागात यंदा 15 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेचा सोहळा पार पडणार आहे. श्रावण (Shravan 2019) महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो, याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव आपापल्या ऐपतीप्रमाणे सोन्या चांदीचा सुद्धा नारळ अर्पण करतात. या निमित्ताने पारंपरिक गाणी नृत्य करून धमाल केली जाते. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात. याच दिवशी राखीपौर्णिमा सुद्धा असल्याने आपल्या भावासाठी तुम्ही ही या खोबऱ्याच्या रेसिपीज बनवून एक ट्रीट देऊ शकता...
नारळ पौर्णिमा विशेष खोबऱ्याच्या रेसिपीज
नारळी भात
नारळाच्या वड्या
नारळाच्या करंज्या/ कानवले
नारळाचा लाडू
खोबऱ्याची पोळी
नारळाची खीर
कोणताही सण म्हंटला की गोडाधोडाचे जेवण हे आलेच.. आणि श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो त्यामुळे यंदा या पारंपरिक पदार्थांनी तुमचा सण आणखीनच खास बनवा.