
Happy Dussehra Wishes In Marathi: दरवर्षी दसरा (Dussehra 2024) हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी येतो. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात आणि हिंदू धर्मात दसऱ्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा केवळ सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि माता सीतेला बंदिवासातून मुक्त केले. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.
या दिवशी माणसाच्या आत असलेला अहंकार, वाईट विचार आणि चुकीची वागणूकही संपुष्टात यावी, अशी प्रार्थना केली जाते. यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्यानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes, Greetings, Quotes, WhatsApp Status द्वारे आपल्या मित्र-परिवारास, नातेवाईकांस या मंगलमय दिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील संदेश, ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा…
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची, दसरा शुभेच्छा.
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी ही तारीख 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:58 वाजता सुरू होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:08 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा 12 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवारी दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे.