Happy Diwali | File Image

Shubh Deepavali Wishes In Marathi: दिवाळी (Diwali) हा रोषणाईचा, रंगांचा, आतषबाजीचा सण आहे. धनतेरस ते भाऊबीज असे पाच दिवस यंदा दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) आणि नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस. यंदा हा दिवाळीचा दिवस 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान करून दिवाळी सणाची सुरूवात केली जाते. मग या आनंदाच्या, चैतन्याच्या दिवसाची सुरूवात तुमच्या प्रियजणांसोबतही आनंदाने करण्यासाठी त्यांना फेसबूक(Facebook) , ट्वीटर (Twitter) , इंस्टाग्राम (Instagram) वर दिवाळीच्या शुभेच्छा, Messages, Quotes, HD Images देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. यंदा दिवाळीचा आनंद असला तरीही कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला, नातेवाईकांना यंदा भेटता येणार नाही. म्हणूनच यावर्षी देखील थोडी खबरदारी बाळगत प्रत्येकाला थेट भेटण्याऐवजी सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा द्या. नक्की वाचा: Diwali 2021 Invitation Messages Formats in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा शेअर करत आप्तांना, मित्रांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस .

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण यंदा 4 नोव्हेंबरला साजरे केले जाणार आहेत. लक्ष्मीपूजनच्या संध्याकाळी लक्ष्मी मातेचं आणि घरातील सोन्या-चांदीच्या वस्तूंचं, धन संपत्तीचं पूजन केले जातं. नक्की वाचा: Lakshmi Puja 2021 Wishes: लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवाराला हे मराठी Messages, Images, Whatsapp Stickers पाठवा.

दिवाळीच्या शुभेच्छा (Happy Diwali Wishes In Marathi)

Happy Diwali | File Image

आली दिवाळी उजळला देव्हारा

अंधारात या पणत्यांचा पहारा

प्रेमाचा संदेश  मनात रुजावा

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा

दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!

Happy Diwali | File Image

उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या संगे

येई दिवाळी बहरूनी अंगणात

करा नाश द्वेष, अंधकाराचा

प्रेम बहरू दे मना मनात

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali | File Image

फटाक्यांची माळ,दिव्यांची रोषणाई,

पणत्यांची आरास,उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ,

दीपावलीचा सण आहे खूप गोड..

दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

Happy Diwali | File Image

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी

माळोनी गंध मधूर उटण्याचा

करू संकल्प  सुंदर जगण्याचा

साधु मुहूर्त दिवाळ सणाचा

दीपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा

Happy Diwali | File Image

दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी

सुखाचे किरण येती घरी

पूर्ण होवोत तुमच्या सार्‍या आशा-आकांक्षा

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीच्या निमित्ताने घराघरात चकली, करंजी, लाडू, शेव असे फराळाचे पदार्थ बनवले जातात. एकमेकांना ते भेट स्वरूपात दिले जातात. पण यंदा कोविड संकटाची तीव्रता कमी झालेली असली तरी संकट टळलेले नसल्याने पुरेशी खबरदारी घ्यायला विसरू नका. फटाके फोडताना देखील पर्यावरण पुरक फटाके फोडण्याला प्राधान्य द्या. ध्वनीप्रदूषण किंवा वायू प्रदुषण होणार नाही याची काळजी देखील घेत सुरक्षित वातावरणामध्ये दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.