आज अश्विन कृष्ण त्रयोदशीचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी (Dhanatrayodashi) किंवा धनतेरस (Dhanateras). आजच्या दिवशी धनाची देवता कुबेर आणि त्यासोबतच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी (Dhanvantari) याची जयंती साजरी केली जातो. त्यामुळे आर्थिक संपन्नेसोबत आजच्या दिवशी निरामय आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबूक स्टेटस, मेसेंजरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित कर. भारतामध्ये आजची धन्वंतरी जयंती(Dhanvantari Jayanti) हा आयुर्वेद दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी आयुर्वेदाने त्याचा कसा सामना केला जाऊ शकतो या थीमवर सेलिब्रेशन केलं जात आहे. Ayurveda Day 2020: धन्वंतरी कोण होते? धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेद दिवस का साजरा केला जातो.
दरम्यान आर्थिक संपन्नता आणि दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्य मिळावं या कामनेसाठी तुम्ही जवळच्या लोकांना आज नक्कीच ही धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स शेअर करू शकता.
धनतेरस व धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा देणारे ग्रीटींग्स
धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती अशी हिंदू पुराणात नोंद आहे. आयुर्वेदाची देवता असलेल्या धन्वंतरी यांचा जन्म काशीच्या चंद्रवंशी राजकुलात झाला असं समजलं जातं. त्यांनी चिकित्सादर्शन, चिकित्सा कौमुदी, योग चिंतामणी, धातुकल्प, वैद्य चिंतामणी, धन्वंतरी निघंटू असे 13 ग्रंथ लिहले आहेत. असे देखील सांगितले जाते.