Happy Daughters Day 2020 HD Images: आज देशभारत 'राष्ट्रीय कन्या दिवस 2020' (National Daughter's Day 2020) साजरा केला जात आहे. याशिवाय जगभरात 11 ऑक्टोबर रोजी 'जागतिक कन्या दिन' साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावं, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी, शिक्षणाचा हक्क मिळावा, मुलगा- मुलगी यातील भेदभाव कमी व्हावा, या उद्देशाने 'राष्ट्रीय कन्या दिवस' (National Daughter's Day) देशभर साजरा करण्यात येतो. भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेकवेळा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखन्यात येत. मात्र, असं असलं तरी, स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. त्यामुळे मुलगा-मुलगी हा भेद सध्या कमी झाला आहे. परंतु, असं असलं तरी अद्याप काही राज्यात स्त्रीभृण हत्येंच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्त्री-भृण हत्येला थारा देणाऱ्या नागरिकांमध्ये मुलगा आणि मुलगी यामधील भेदभाव मिटवण्यासाठी राष्ट्रीय कन्या दिवस एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे.
याशिवाय सरकारकडून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात. यासाठी सरकारने अनेक योजनादेखील राबवल्या आहेत. या सर्व योजना पुरुष आणि स्त्रियांमधील भेदभाव मिटवण्यास उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे मुलीकडे ओझं म्हणून पाहण्याचा दृश्यष्टीकोण हळूहळू बदत आहे. आज राष्ट्रीय कन्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या गोंडस मुलीला Wishes, WhatsApp Status, Quotes, शेअर करून शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील फोटोज नक्की उपयोगात येतीलय (हेही वाचा - National Daughters Day 2020 Messages: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त मराठमोळे संदेश, Wishes, Images, Greetings शेअर करुन लाडक्या लेकीची दिवस करा स्पेशल!)
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या शुभेच्छा!
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा,
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगा शिकला तर एक घर उजळेल,
मुलगी शिकली तर दोन घर उजळतील,
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्त्रीचं अनन्य साधारण महत्त्व असतं. याशिवाय देशाच्या विकासातदेखील महिलांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यामागे मुलगा-मुलगी हा लिंगभेद कमी व्हावा, मुलींना सन्मान आणि प्रत्येक क्षेत्रात संधी मिळावी, मुलींचे आरोग्य, शिक्षण आणि पोषण याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी, आदी उद्देश आहेत. यंदाचा कन्या दिन तुमच्यासाठी आनंददायी ठरो, अशी अपेक्षा!