महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या निमित्ताने आजुबाजूच्या स्त्रिया मैत्रिणी नातेवाईक यांना बोलावून त्यांना हळदीकुंकवासोबतच वाण अर्थात भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार हा पहिलाच सण असल्याने या निमित्ताने वर्षाच्या सुरूवातीलाच प्रियजनांना भेटून आनंद शेअर करण्याची मज्जा काही और असते. मग यंदा तुमच्याही घरीही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार असाल तर या खास अंदाजात आमंत्रण पत्रिका नातेवाईक, मैत्रिणींसोबत शेअर करत त्याचा आनंद द्विगुणित करा. यासाठी खालील फॉर्मेट्स चा तुम्ही वापर करू शकता आणि सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबूक द्वारा मेसेज करत त्यांना आमंत्रित करू शकता.
मकरसंक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा झाल्यानंतर संक्रांतीच्या दिवसापासून यंदा 4 फेब्रुवारीला रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांत विशेष उखाण्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हमखास होणारा 'नाव घेण्याचा' अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खास उखाणे!
हळदी कुंकू आमंत्रण नमुना
नमुना 1:
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 19 जानेवारी 2025, राविवार दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही आपण सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता यावे ,
धन्यवाद
पत्ता-
-----------------------------
नमुना 2:
विसरून जा सारे जुने वाद
संक्रातीच्या निमित्ताने
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात
सहभागी होत करू नवी सुरूवात
स्थळ -
वेळ-
तारीख-
---------------------------------
नमुना 3:
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ -
तारीख/ वेळ -
----------------------------
नमुना 4:
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची उत्सुकता नवविवाहितांमध्ये अधिक असते. लग्नानंतर पहिली पाच वर्ष विशिष्ट वाण महिलांना देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आणि हलव्याच्या दागिन्यांनी साजशृंगार करून या दिवसाची शोभा वाढवली जाते.