Hajj 2021 यंदा कधी? जाणून घ्या या मुस्लिम धार्मिक यात्रेच्या तारखा ते या सहा दिवसांच्या यात्रेमध्ये नेमकं काय होतं?
Hajj Yatra (Photo Credits-Facebook)

जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी खास असलेली 'हज' यात्रा यंदा जुलै महिन्यात सुरू होणार आहे. सौदी अरेबिया मध्ये दरवर्षी या धार्मिक यात्रेमध्ये मुस्लिम बांधव एकत्र येतात. दरम्यान सध्या जगातील कोविड 19 चा धुमाकूळ पाहता यावर्षी सौदी अरेबियामधील किंग्डम कडून या यात्रेत सहभागी यात्रेकरूंची संख्या 60 हजार व्हॅक्सिन घेतलेले मुस्लिम बांधव इतकी करण्यात आली आहे. यामध्ये देखील 18-65 वयोवर्ष ही मर्यादा आहे. कोरोना संकट पाहता यंदा देखील परदेशी नागरिकांना हज 2021 मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. आर्थिक दृष्ट्या सबळ आणि शारिरीक दृष्ट्या धडधाकट असलेली कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्यांच्या धर्मानुसार, पाच आधारांपैकी एक असलेल्या या हज यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो.

हज 2021 यंदा कधी आहे?

इस्लामिक कॅलेंडर नुसार, Dhul al-Hijjah या 12 व्या आणि अंतिम महिन्यात आठव्या दिवशी हज असते. Supreme Court of Saudi Arabia नुसार, Dhul al-Hijjah यंदा ग्रेगेरियन अर्थात इंग्रजी कॅलेंडरनुसार 11 जुलै पासून सुरू होत आहे. तर 18 जुलै दिवशी हज आहे. 17 जुलै च्या सूर्यास्तानंतर इस्लामिक धर्मानुसार सारे विधी सुरू होतील.

हज शी निगडीत काही खास बाबी

  • हज च्या सुरूवातील प्रत्येक सहभागी पुरूष व्यक्तीला Ihram परिधान करावा लागतो. Ihram म्हणजे पांढरे कपडे. महिला सामान्य कपडे परिधान करू शकतात.
  • देवासमोर सार्‍या व्यक्ती समान आहेत हा संकेत देणारा पोषाख म्हणजे Ihram.एकदा ते परिधान केले तर तुम्ही एका पवित्र वातावरणात असता. त्यामुळे याकाळात तुम्ही सेक्स करू शकत नाही, नखं, दाढी, केस कापू शकत नाही. परफ्यूम वापरू शकत नाही.
  • हज यात्रेच्या पहिल्या दिवशी मक्काच्या Kaaba मध्ये प्रार्थना केली जाते. दुसर्‍या दिवशी मिना मधून Mount Arafat ला भाविक जातात. इथे अल्लाह कडे चूकांची कबुली देत माफीची याचना करतात. त्यानंतर Arafat आणि Mina दरम्यान असलेल्या Muzdalifah ला देखील भेट दिली जाते.
  • Muzdalifah ला पोहचल्यानंतर Maghrib आणि Isha यांच्या एकत्र प्रार्थना केल्या जातात. या दिवशी आभाळाखाली जमिनीवर झोपण्याची प्रथा आहे.
  • हजचा तिसरा दिवस हा Eid al-Adha सोबत येतो. या दिवशी प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. त्यानंतर भाविक पुन्हा Kaaba ला येतात.
  • चौथ्या दिवशी मिना मध्ये आल्यानंतर तेथील 3 पिलर्सवर 7 गारगोटी दगड मारण्याची पद्धत आहे. हाच प्रकार पाचव्या दिवशी देखील केला जातो.
  • शेवटच्या दिवशी हज सोडण्यापूर्वी अंतिम Tawaf al-Wadaa करण्याची पद्धत आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामध्ये कोणत्याही गोष्टींची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही.