आपल्या मराठी नववर्षाची खरी सुरवात चैत्र महिन्यातला पहिला मराठमोळा सण गुढीपाडव्याने होते. या वर्षीचा 'गुढीपाडवा' (Gudi Padwa) 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. सण म्हटलं की दाराला तोरण, गोडधोड पदार्थ आणि सर्वात महत्वाच म्हणजे अर्थात घरच्या दारासमोर काढली जाणारी सुंदर आणि रंगेबिरंगी रांगोळी (Rangoli) .भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. त्यामुळे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस सुद्धा या रांगोळी शिवाय पूर्ण होऊच शकत नाही हो ना? यंदा हा सण कोरोनाच्या भीतीने घरातच साजरा करावा लागणार आहे त्यामुळे देवापाशी काढता येतील अशा काही सोप्प्या रांगोळ्या आता आपण पाहणार आहोत. Gudi Padwa 2020: यंदा गुढीपाडव्या निमित्त गुढी कशी उभाराल?
गुढी पाडवा विशेष रांगोळी
बांगड्यांचा वापर करुन काढलेली रांगोळी
चमच्याचा वापर करुन काढलेली रांगोळी
काडी आणि बाटलीच्या झाकणाने काढलेली रांगोळी
कंगव्याचा वापर करुन काढलेली रांगोळी
हल्ली रांगोळीचे ही बरेच प्रकार आपल्याला पहायला मिळतात. अगदी सुरवतीपासून काढली जाणारी ठिपक्यांची रांगोळी, पाच बोटांचा वापर करून काढली जाणारी संस्कार भारती रांगोळी किंवा मग बाजारात उपलब्ध असणाऱ्या साचांच्या किंवा पेनाचा वापर करून काढण्यात येणारी रांगोळी. पण बऱ्याचदा आपल्याला आयत्या वेळी कोणती रांगोळी काढावी हे सूचत नाही. त्यावेळी तुम्ही या रांगोळ्यांच्या डिझाईन्स ट्राय करु शकाल.