Happy Gudi Padwa 2020 Wishes: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings, Images, GIFs आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून देऊन उत्साहात करा नववर्षाचा आरंभ!
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

Happy Gudi Padwa 2020 Marathi Wishes: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa). या चैत्र पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचा उत्साह काही औरच असतो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जंगी स्वागत केले जाते. वसंताचे आगमन आणि गुढीपाडव्या सारखा शुभ क्षण असा सुंदर मिलाफ नववर्षानिमित्त साधला आहे. गुढी पाडव्यानिमित्त गुढी उभारण्यासोबत गोडाधोड्याचे पदार्थांची घरोघरी रेलचेल असते. या शुभ सणानिमित्त स्त्रियाही आपली नटण्याची हौस पुरवून घेतात. रांगोळ्या, तोरणे दारी सजतात. एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. (Gudi Padwa 2020 Messages: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत!)

मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सर्व शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे शक्य होणार नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देऊनच यंदाचा पाडवा साजरा करावा लागणार आहे. गुढीपाडव्या निमित्त आपल्या प्रियजननांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे संदेश, मेसेजेस, ग्रिंटीग्स, Images, GIF's . व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा नववर्षाचा हा उत्सव. (गुढीपाडव्या निमित्त गुढी कशी उभाराल?)

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा:

वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa 2020 (1)
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa 2020 (2)
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

Gudi Padwa 2020 (3)
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष,

येणारा नवीन दिवस करेल

नव्या विचारांना स्पर्श,

हिंदू नव वर्षाच्या आणि

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa 2020 (4)
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa 2020 (5)
Gudi Padwa 2020 (Photo Credits: File Photo)

GIF's:

via GIPHY

via GIPHY

नवीन वर्षानिमित्त अनेक विचार, संकल्प, स्वप्न आणि इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात. या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवं वर्ष नवीन उमेद घेऊन येतं. या नववर्षात आपणही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करु. मात्र सध्या जगावर घोंगावत असणारे कोरोना व्हायरसचे संकट या नववर्षात दूर होवो आणि पुढील वर्ष आरोग्यसंपन्न जावो अशाच शुभेच्छा आपण सर्वांना देऊया.