
Happy Gudi Padwa 2020 Marathi Messages : महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा (Chaitra Padwa) म्हणजेच गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणापासून होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस यंदा 25 मार्च दिवशी आहे. या दिवशी दारात मोठ्या गुढ्या उभारून नागरिक नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतात. चैत्र महिन्यातच वसंत ऋतूची सुरूवात होते. त्यामुळे निसर्गात झाडांना पालवी फुटते. निसर्गातील नवचैतन्याचा हा सण आपल्या आयुष्यातही नवी सुरूवात घेऊन येवो याची कामना करत नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) यारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स (Greetings), शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून शेअर करून या नववर्षाच्या शुभेछा देत मराठमोळ्या नववर्षाचा आनंद द्विगुणित करा. यंदा गुढी पाडव्याचा सण हा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भव्य स्वरूपात साजारा केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या मनात असूनही आज नातेवाईकांना भेटणं टाळा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या एका क्लिकवर जगाच्या कानाकोपर्यात विखुरलेल्या तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठी शुभेच्छा द्यायला नक्की मदत करा. Gudi Padwa 2020 Rangoli Designs: गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा चैत्र पाडव्याचं स्वागत!
गुढी पाडवा दिवशी दारात गुढी उभारून तिचं पूजन केलं जातं. त्यानंतर घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते. तर बत्ताश्यांचा नैवेद्य वाटला जातो. गुढी पाडव्याचा सण हा चैत्र नवरात्रीचा देखील पहिला दिवस असतो. त्यानिमित्ताने चैत्र गौरीचे पूजन केले जाते. आणि सारे अमंगल दूर व्हावं यासाठी प्रार्थना करतात. Gudi Padwa 2020: यंदा गुढीपाडव्या निमित्त गुढी कशी उभाराल?
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे मेसेजेस

चैत्राची नवी पहाट घेऊन आली नव स्वप्नांची लाट
नवारंभ नवा विश्वास
नववर्षाची हीच खरी सुरूवात
मराठमोळ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमची सारी स्वप्नं पुरी होवोत
ही मनात घेऊन इच्छा
पाठवत आहे मी तुम्हांला
गुढी पाडवा अन मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या शुभ्र आभाळी
शोभे उंच गुढी
हे नववर्ष घेऊन येवो
तुमच्या आयुष्यात गोडी
गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूची ही नवी पहाट
घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा
चला उभारू गुढी नववर्षाची
साजरा करत चैत्र पाडवा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेछा!

गुढी उभारून लावू विजयाची पताका
सण- संस्कार अन संस्कृतीच्या विस्तारू शाखा
सार्या पूर्ण होवोत तुमच्या आशा अपेक्षा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून कशा द्याल शुभेच्छा
आजकाल जगभरात व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय अॅप आहे. याच्या माध्यमातून आता सणवारांना खास स्टीकर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. यामध्ये खास मराठमोळ्या व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही आता गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी गूगल प्ले स्टोअर्स वर Gudi Padwa Marathi Stickers टाईप करून आवडीचा पॅक डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्रात चैत्र पाडवा म्हणजे नववर्षाची सुरूवात गुढी पाडवा म्हणून ओळखली जाते तसाच आंध्रप्रदेशात हा सण 'उगादी' म्हणून साजरा केला जातो. यंदा या सणाचा गोडवा घरात बसूनच द्विगुणित करा. वाईटाचा नाश करून नव्या वर्षात प्रवेश करताना तुमच्या सार्या आशा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमची प्रार्थना... तुम्हांला नव वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!