Easy Rangoli Designs for Gudi Padwa 2020 (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

Gudi Padwa  Special Rangoli Designs: मराठी नववर्षाची सुरूवात चैत्र पाडव्याला होते. यंदा हा गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण हा 25 मार्च ला साजरा केला जाणार आहे. दरम्यान कोणत्याही भारतीय सणामध्ये रांगोळीचं विशेष महत्त्व असतं. मग यंदा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सहजसोप्या रांगोळी घराच्या दारात काढण्यासाठी काहींची पसंती ठिपक्याच्या रांगोळीला (Rangoli)  असते तर काही जण संस्कार भारतीसारख्या खास रांगोळी प्रकारातून सणाला दारात विविध रांगोळ्या काढतात. महाराष्ट्रात हा चैत्र पाडवा (Chaitra Padwa) हा गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो तर आंध्र प्रदेशामध्ये तो 'उगादी' (Ugadi) म्हणून ओळखला जातो. यंदा कोरोना व्हायरसचं सावट भारतीय सणांवर आहे. त्यामुळे सामुहिक स्तरावर गुढी पाडवा साजरा करण्याऐवजी तो घराघरात आणि अत्यंत खाजगी स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मग यंदा घरी राहूनच गुढी पाडव्याचा आनंद लुटायचा असेल तर गुढी पाडव्याच्या निमित्ताने घराच्या दारात सहज सोप्या रांगोळ्या कशा काढाल हे नक्की पहा. Gudi Padwa 2020 Date: यंदा 25 मार्चला गुढीपाडवा दिवशी साजरा करा हिंदू नववर्ष!

गुढी पाडवा सणा निमित्त दारात काढण्यासाठी सहज सोप्या रांगोळ्या

 

View this post on Instagram

 

Happy Gudi Padwa. #gudi #gadipadwa #rangoli #gudipadwarangoli

A post shared by Hakuna Matata (@mug.s) on

गुढी पाडवा डिझाईन

गुढी पाडवा रांगोळी

गुढी पाडवा विशेष रांगोळी डिझाईन

भारतामध्ये महत्त्वाच्या मंगल प्रसंगी सकाळी दारात रांगोळी काढण्याची प्रथा आहे. देशाच्या विविध प्रांतामध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने काढली जाते. रांगोळी ही सरवत्र शुभ आणि अशुभ निवारण्यासाठी साकारली जाते. रांगोळी बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे.