22 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2020) सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अगदी साध्यापणाने साजरा होणार असला तरी, प्रत्येकाच्या घरी या सणाची धामधूम पाहायला मिळते. बाप्पांचे आगमन झाल्यावर तीन दिवसांनी म्हणजे मंगळवार दि. 25 ऑगस्ट रोजी गौरींचे (Gauri 2020) आवाहन करण्यात येणार आहे. गौरीचे आवाहन मंगळवारी दुपारी 1.59 नंतर अनुराधा नक्षत्रावर करावे. गौरीपूजन (Gauri Pujan 2020) हा महाराष्ट्रातील खास सण आहे. यास काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात.
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलतात. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. गौरींच्या आगमनानंतरचा दुसऱ्या दिवस हा तिशय महत्वाचा असतो. या दिवशी गौरींची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवद्य दाखवतात. याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्रात काही जागी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. महिला एकमेकींच्या घरी हळदीकुंकवाला जातात. तर अशा या गौरी पूजनाच्या दिवशी खास HD Wallpapers, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पंच पक्वान्नाचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद्य
करुन पूजा आणिआरती, शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भुलचुक मजशी माफ करो, सुख समृध्दीचे दान पदरी घालो
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
आली आली गं गौराई, माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं, तिला जेवू घालूया
तिला भरजरी पैठणीचं, पदर देऊया
गौरी पूजेच्या शुभेच्छा!
काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!
गौरी पूजनाचा दिवस त्याच्या नैवेद्यामुळे खास ठरतो. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा, रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखवतात. नंतर दुपारी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्याडो गोष्टींचा नैवेद्यात समावेश असतो.
(हेही वाचा: गणेश चतुर्थी निमित्त हातावर काढून पाहा या सुंदर गणपती मेहंदी डिझाइन (See Photos and Video Tutorials)
दरम्यान, हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे.