![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-2-380x214.jpg)
Ganesh Chaturthi 2023 HD Images: गणेश चतुर्थी जवळ येत आहे. बाप्पा जिथे राहतो तिथे सदैव सुख-समृद्धी नांदते असं म्हणतात. गणेशोत्सवात श्रीगणेशाची यथासांग पूजा केल्याने तो अधिक प्रसन्न होतो. दरवर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि 10 दिवसांनी बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपतो. 19 सप्टेंबर रोजी तुम्ही गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करू शकता. 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्थी आहे. यंदा 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव चालणार आहे. (हेही वाचा -गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!)
गणेश चतुर्थी निमित्त (Ganesh Chaturthi 2023 HD Images) आपणही आपल्या आप्तेष्टांना WhatsApp, Facebook आणि सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवरुन Messages पाठवून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. ज्यामुळे तुमचा यंदाचा गणेशोत्सव अधिकच आनंददायी होईल. तुम्ही खाली इमेजेल डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-1.jpg)
गणेश चतुर्थीच्या मनापासुन शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-5.jpg)
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
(हेही वाचा: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी? जाणून घ्या गणपती स्थापना मुहूर्त आणि विधी)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-4.jpg)
बाप्पाच्या आगमनला, सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-3.jpg)
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/09/Ganesh-Chaturthi-2023-HD-Images-6.jpg)
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया
यावर्षी, बाप्पाच्या स्थापनेचा सर्वात शुभ मुहूर्त 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:50 ते दुपारी 2:56 पर्यंत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.