Ganesh Chaturthi 2019: सिद्धिविनायक, लालबागचा राजा, GSB सह मुंबईत गणेशोत्सवाला सुरूवात; पहिल्या दिवसापासून भाविकांची दर्शनाला गर्दी
Ganesh Chaturthi 2019 (Photo Credit: ANI)

गणेशभक्तांचा आवडीचा सण गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आज (2 सप्टेंबर) पासून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशात परदेशात गणेश पूजन करून पुढील 10 दिवस हा सण साजरा करण्यासाठी भाविक एकत्र आले आहेत. मुंबईमध्ये प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईतील सर्वाय श्रीमंत गणपती जीएसबी सेवा मंडळ सह मुंंबईचं आकर्षण असलेल्या अनेक मंडळांमध्ये भाविकांची दर्शनाला रीघ लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ब्राम्ह मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापणा आणि आरती झाल्यानंतर भाविकांनी दर्शनाला मोठ्या रांगा लावल्याचं चित्र अनेक गणेश मंदिरांमध्ये दिसत आहे. Ganesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव

मुंबईतील श्रद्धास्थान समजल्या जाणार्‍या सिद्धिविनायक मंदिरामध्येही गणेश पूजन झाल्यानंतर काकड आरतीच्या वेळी मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. तर लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना सकाळी 6 वाजल्यापाऊन दर्शन खुले करण्यात आले आहे. तर माटूंग्याच्या GSB मंडळाचा आणि मुंबईतील सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपतीदेखील भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा गणपती केवळ 5 दिवस दर्शनासाठी असतो. Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 1: लालबागच्या राजाचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं; इथे पहा आरतीचं थेट प्रक्षेपण

महाराष्ट्रात मुंबईसह अन्य गणेश मंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केली आहे. पुढील 10 दिवस घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.