Sunni Ruet Hilal committee ने आज शव्वाल चंद्रकोरीचे दर्शन न झाल्याने मुंबाई मध्ये 25 मे दिवशी Eid-al-Fitr साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. 

 आज चंद्र दिसू शकला नाही म्हणून ईद-अल- फितर 25 मे रोजी साजरा केली जाईल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण सावधगिरी बाळगणे आणि सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे. हात मिळवणे आणि मिठी मारण्यापासून आपण दूर असले पाहिजे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे आपण पालन केले पाहिजे असे, दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, सय्यद अहमद बुखारी म्हणाले आहेत. 

 मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे हिलाल समित्या शव्वाल चंद्रकोरबाबत लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात अद्याप चंद्र दर्शन झालेले नाही. राज्यातील विविध भागत लोक शव्वाल चंद्रकोर पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. रमजान ईद तारीखेच्या अपडेट्स बद्दल सारी माहिती झटपट मिळण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या. 

कर्नाटक आणि केरळ राज्यात आज रोजेला 30 दिवस पूर्ण झाले आहेत. यामुळे रविवारी दोन्ही राज्यात ईदचा सण साजरा केला जाणार आहे. दोन्ही राज्यात एकाच दिवस अगोदर चंद्राचे दर्शन झाले होते. त्यामुळे रमजान ईद तारीखेच्या अपडेट्स बद्दल सारी माहिती झटपट मिळण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या. 

 भारताच्या पूर्वेकडील गुजरातमध्ये शव्वाल चंद्रकोरोचा शोध सुरू आहे. शेजारच्या सिंधमध्ये सायंकाळी 7.30 नंतर शव्वाल चंद्रकोर दिसण्याची शक्यता आहे, असे पाकिस्तानचे  विज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले होते.  

मुंबई, दिल्ली, लखनऊ, कोलकाता येथून हिलाल कमिटी थोड्याच वेळात शव्वाल चंद्रकोर बाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये इफ्तारनंतर लोक चंद्र पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच चंद्र दिसल्यास उद्या ईद साजरी केली जाणार आहे.  

हिलाल कमिटी थोड्याच वेळात शव्वाल चंद्रकोर बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 
 

मोगरीबच्या नमाजानंतर आसाममधील गुवाहाटी आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून ईद-अल-फितरची घोषणा होण्याची शक्यता आहे.  

Moon Sighting Committeesच्या चंद्र दर्शनानंतर दिल्या जाणार्‍या निर्णयाकडे आज भारतातील तमाम मुस्लिम बांधवांचे लक्ष लागले आहे. आज भारतात यंदा रमजान ईद कधी साजरी केली जाणार? याचा निर्णय हिलाल कमिटीकडून दिला जाणार आहे. आज भारतामध्ये 29 वा रमजानचा रोजा आहे. आज चंद्र दर्शन झाल्यास Eid Al-Fitr चा म्हणजेच रमजान ईदचं सेलिब्रेशन उद्या (24 मे) दिवशी होईल. जर चंद्र दर्शन झाले नाही तर 30 दिवसांचा रोजा संपूर्ण करून भारतामध्ये 25 मे, सोमवारी रमजान ईद साजरी केली जाऊ शकते. मग यंदाच्या रमजान ईद बद्दल तुमच्या मनातही उत्सुकता असेल तर मगरीबच्या प्रार्थनेनंतर पहा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रामध्ये 'चांद रात' बाबत हिलाल कमिटी काय निर्णय देते?

भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, उत्तरप्रदेश प्रमाणेच आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर मध्ये मुस्लिम बांधवांचे संध्याकाळी चंद्र दर्शनाकडे लक्ष असेल. रमजानच्या शेवटच्या जुम्माच्या रात्री सौदी अरेबिया सह अनेक आखाती देशांमध्ये ईदची तारीख ठरवण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र त्यांना चंद्र दिसलेला नाही. तेथे 30 दिवसांचा रोजा पूर्ण करून ईद साजरी केली जणार आहे.

सध्या जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने मुस्लिम बांधवांबा यंदा ईदचा सण साध्या पद्धतीने आणि घरातच्याघरातच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट पाहता यंदा घरीच नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी चांदणे दिसू शकतात आणि रविवारी ईद साजरी केली जावी, अशी घोषणा पाकिस्तानचे विज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी केली. खगोलशास्त्रीय आकडेवारीवर आधारित त्यांनी दिलेली सूचना देशातील मुस्लिमांना बंधनकारक नाही कारण ते केंद्रीय रुत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मुफ्ती मुनीब उर रहमान यांच्या अंतिम निर्णयाची वाट पाहतील.