भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी देशासाठी व समाजासाठी केलेले कार्य, त्याग, त्यांचे संपूर्ण जीवन आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे व पुढेही ते तसेच असेल. बाबासाहेबांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. उद्या बाबासाहेबांची 130 वी जयंती साजरी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, शिक्षणाचा प्रसार व्हावा, देशात लोकशाही नांदावी यासाठी बाबासाहेबांनी विशेष प्रयत्न केले.
बाबसाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांचा दांडगा अभ्यास होता. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. तर अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त खास Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes च्या माध्यमातून त्यांचेच काही प्रेरणादायी विचार शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप होते.
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
अन्यायाविरूद्ध लढणाची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
वाणी व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. त्यासाठी मनाला संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे
(हेही वाचा: भीम जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Messages!)
दरम्यान, स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. त्यांनी 1956 मध्ये आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.