Ambedkar Jayanti 2022 Messages in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. ज्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आंबेडकर यांनी महिला हक्क आणि कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे, भारतीय प्रजासत्ताकच्या संपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Babasaheb Ambedkar Jayanti) निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन भीम जयंतीचा उत्सव साजरा करा. बी आर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही भीम उत्सव द्वगुणित करू शकता. Bhim Jayanti 2022 Wishes In Marathi: भीम जयंती च्या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत अभिवादन करा महामानवाला
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
मनुस्मृती’ दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदा आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. पुरातन समजुती आणि कल्पनांपासून भारताला मुक्त करण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रातील आपली मजबूत पकड वापरली. त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या संकल्पनेला विरोध केला आणि सर्वांना समान अधिकारांचा पुरस्कार केला.