
Vijayadashami Dasara Wishes in Marathi: आज विजयादशमी, म्हणजेच दसरा! असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा हा सण आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याला विशेष स्थान आहे. याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून सीमोल्लंघन केले होते. नऊ दिवसांच्या नवरात्री उत्सवानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. या दिवशी रावण दहन, शस्त्र पूजा केली जाते आणि अनेक नवीन कामांची सुरुवात केली जाते. हा दिवस पारंपरिक पद्धतीने कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसोबत साजरा करण्याची प्रथा आहे. पण आताच्या डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा पाठवून हा सण खास बनवू शकता. त्यासाठीच, आम्ही तुमच्यासाठी खास मराठमोळ्या विजयादशमीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
तुम्ही या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Quotes, ग्रीटिंग्ज किंवा पोस्ट म्हणून तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांच्यासोबत दसऱ्याचा आनंद साजरा करू शकता.
नसे भय पराजयाचे
विजयाचे आम्हा वेड
लुटूनी सोने आनंदाचे
रोवितो प्रेमाची मुहूर्तमेढ
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रावणाचा वध करुनी
राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा,
आनंदाने करू दसरा साजरा
दसऱ्याच्य हार्दिक शुभेच्छा!
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षावा
चैतन्यास संजीवनी लाभोनी,
होवो साजरा मनी उत्सव तो नवहर्षाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
झेंडूची फुले,
आंब्याची पाने घरोघरी तोरणे सजली
रंगबेरंगी रांगोळी सजली
नवरात्रीच्या नऊ दिवसाचा पूर्ण झाला प्रवास
आला दसऱ्याचा दिवस खास
तुम्हा सर्वाना दसऱ्याच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
ठेवुनी चेहरा हसरा,
दुख सगळे विसरा!
सोनियाचा दिन आपुला,
तो विजयादशमी दसरा!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रावण दहन का करतात?
हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार, दसरा किंवा विजयादशमीच्या दिवशी दहा तोंडांच्या रावणाचा वध भगवान श्रीरामांनी केला होता. रावण हा वाईट आणि अहंकाराचे प्रतीक मानला जातो. विजयादशमीला रावणाचा पुतळा जाळण्यामागे असा संदेश आहे की, अधर्म, अन्याय, अत्याचार आणि अनैतिकता यांचा नेहमीच पराभव होतो, तर चांगुलपणा आणि धर्म यांचा नेहमीच विजय होतो. रावण दहन ही शिकवण देते की तुम्ही कितीही शक्तिशाली आणि गुणवान असलात तरी, जर तुम्ही अन्यायाच्या आणि अधर्माच्या मार्गावर चाललात, तर एक दिवस तुमचा निश्चितच अंत होईल.
या ठिकाणी रावणाचे दहन करत नाहीत
विजयादशमीला देशातील अनेक भागांमध्ये रामलीलेच्या शेवटी रावणाचा पुतळा जाळला जातो. पण काही ठिकाणी ही परंपरा पाळली जात नाही.
- बिसरख: रावणाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील बिसरख या ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जात नाही. येथील लोक रावणाची पूजा करतात.
- मंदसौर: रावणाची पत्नी मंदोदरीशी संबंधित असलेले मध्य प्रदेशातील मंदसौर या शहरातही रावणाचे दहन केले जात नाही, कारण तेथील लोक रावणाला पूज्य मानतात.