Dhanteras 2019: घरात पैसा टिकत नसेल तर 'धनतेरस' च्या दिवशी करा या 10 गोष्टी, लक्ष्मीची होईल भरभराट
Dhanteras (Photo Credit - File Photo)

दिवाळीत वसुबारस नंतर येणारा सण म्हणजे धनत्रयोदशी (Dhanteras) . आपण घरात अथवा आपल्या आयुष्यात पैसा, सुख-समृद्धी कायम राहावी, लक्ष्मी म्हणजेच संपत्ती नांदावी यासाठी धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरीची पूजा करुन आपल्या परिवाराच्या स्वास्थ्य आणि समृद्धीची कामना केली जाते. असे म्हणताता या दिवशी लक्ष्मी गृहप्रवेश करतात आणि त्यामुळे आपल्या घरातील दारिद्य्राचे पतन होते. तसेच धन्वंतरीच्या पूजनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात किंवा व्यवसायात कोणतीही आर्थिक अडचण उद्भवू नेय किंवा त्यासंबंधी काही अडअडचणी असल्यास त्या दूर व्हाव्यात यासाठी ही पूजा करणे लाभदायक असते.

काही लोकांच्या घरात कितीही प्रयत्न केला तरीही पैसा म्हणजेच लक्ष्मी जास्त टिकत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यात पैसा कमवण्याची धमक असते मात्र ते टिकवण्याची बुद्धी नसते. अशा लोकांनी धनत्रयोदशी दिवशी पुढील गोष्टी केल्यास त्यांच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होईल लक्ष्मीचा सदैव वास राहील.

धनत्रयोदशी दिवशी काय करावे:

1. धनत्रयोदशी दिवशी सर्वात आधी सायंकाळी 13 दिवे प्रज्वलित करावे आणि त्यानंचर घरातील तिजोरीत कुबेराचे पूजन करावे.

2. नंतर चंदन, दीप, धूप आणि नैवेद्य दाखवून आरती करावी आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करावी.

3. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे सायंकाळी लावलेल्या 13 दिव्यांच्या जवळ 13 कवड्या ठेवाव्या. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोप-यात दाबून घ्या. यामुळे अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचे योग जुळून येतील. Dhanteras 2019 Shubh Muhurt: धनतेरसच्या दिवशी पुजा आणि सोनं खरेदीचा ‘हा’ आहे शुभ मुहूर्त

4. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. याने दारिद्रय, अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

5. तसेच जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर त्या लोकांना धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या.

6. या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्‍या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. अशाने जमा पुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.

हेदेखील वाचा- Happy Dhanteras 2019 Messages: धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Greetings, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं!

7. या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही.

8. या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. त्यांना यशाशक्ती दान करावे.

9. आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाचे डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील. ही डहाळी घरातील ड्राइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.

10. या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे. जसं जसं झाडं मोठे होईल तसं तसं यश वाढत जाईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी वाद, भांडण टाळावे. घरात शांती आणि सकारात्मकता राहू द्यावी असे केल्यास लक्ष्मी देवीचा वरदहस्त कायम तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या घरात धन-संपत्ती सुखा-समाधानाने नांदेल.

(टीपवरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहेलेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )