Dhanteras Messages (Photo Credits: File)

Dhantrayodashi Messages: आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी येणारा सण म्हणजे धनत्रयोदशी. या सणाला धनतेरस असेही म्हणतात. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनाचे महत्व पटवून देणा-या आणि त्याचे पावित्र्य जपणा-या या सणाला सामान्य लोकांसोबत व्यापा-यांसाठी हा दिवस विशेष असतो.

असा हा मंगलदिन सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशा शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छापत्रं...

Dhanteras Messages (Photo Credits: File)
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख-समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Dhanteras Messages (Photo Credits: File)

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

हेदेखील  वाचा- Dhanteras 2019 Puja Vidhi: धनत्रयोदशी दिवशी कुबेर आणि धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Dhanteras Messages (Photo Credits: File)

धनत्रयोदशीचा हा सण आणेल

तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण

लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या दारी,

तुमची मनोकामना होवो पूरी

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

Dhanteras Messages (Photo Credits: File)

धनत्रयोदशीच्या निमित्ताने

आपणास व आपल्या कुटुंबास

धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा

शुभ दीपावली

Dhanteras Messages (Photo Credits: File)

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची

करोनी औचित्य दिपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची...

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

भारतात काही ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने-चांदीची भांडी, नाणी, आभूषण इत्यादींची खरेदी देखील करतात. त्यामुळे या दिवशी तुमच्या आप्तलगांना धनसंपत्तीची भरभराट होवो या शुभेच्छा देण्यासाठी या मराठमोळ्या ग्रीटिंग्स तुम्हाला नक्की कामी येतील.