
Dhanteras 2021 HD Images: कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. हा दिवस धन त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो, जो धनाचा देव कुबेर यांना समर्पित आहे. काही ग्रंथांमध्ये कुबेरांना देवांचे खजिनदार असेही वर्णन केले आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेले मौल्यवान धातू अक्षय असतात. या दिवशी पंचोपचार पद्धतीने कुबेर देवाची पूजा केल्याने आर्थिक संकट आणि रोगांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.(Diwali 2021 Greetings for Soldiers: दीपावली निमित्त भारतीय सैनिकांचे आभार मानत द्या शुभेच्छा!)
या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर तिची कृपादृष्टी कायम राहून कधीही धनाची कमी पडू नये उलट भरभराट होवो यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. आज सर्वत्र धनत्रोयदशीचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला आजच्या दिवशी Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून मित्रपरिवाला द्या शुभेच्छा!






पौराणिक मान्यतेनुसार धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून यंदा धनाची पूजा करण्यासोबत आपल्या आप्तेष्ठांना धनतेरसचे शुभेच्छा संदेश पाठविण्यास देखील विसरू नका.