Datta Jayanti Wishes In Marathi: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरी केली जते. यंदा 7 डिसेंबरला दत्त जयंतीचा उत्सव (Datta Jayanti Utsav) साजरा केला जाणार आहे. भगवान दत्तात्रेय यांचा हा जन्मदिनाचा सोहळा भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या मंगल दिनाची तुमच्या प्रियजनांची, मित्रमंडळींची, आप्तेष्टांची आणि नातेवाईकांची सुरूवार खास दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही नक्कीच करू शकता. या दिवसानिमित्त महाराष्ट्रभरातील दत्त मंदिरं सजलेली असतात. भगवान दत्त हे देखील विष्णूचा एक अवतार मानला जातो. त्यामुळे दत्त जयंतीचा दिवस सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, HD Images, Greetings शेअर करून तुम्ही नक्की साजरा करू शकाल.
ऋषी अत्री आणि पत्नी अनुसया यांच्याकडे तीन पाहुणे साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश आले होते, हे अत्री ऋषींनी ओळखले. त्यांची नावे चंद्र, दत्त व दुर्वास अशी ठेवण्यात आली. त्यामधील दत्त हा विष्णूचा अवतार होता. पुढे चंद्र चंद्रलोकी निघून गेला. दुर्वास तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि दत्त या तिघांचे रुप म्हणून राहीला. त्याला तीन डोकी आणि सहा हात असल्याने दत्तात्रेय असे नाव पडले. तर देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्रि ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय. त्यामुळे दत्त आणि अत्रेय मिळून दत्तात्रेय नाव पडेल अशी कहाणी प्रचलित आहे. Dattatreya Jayanti 2022: दत्तात्रेय जयंतीची तारीख, महत्व, कथा आणि पूजा विधी, जाणून घ्या, सविस्तर माहिती .
दत्त जयंतीच्या शुभेच्छा
दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दत्त जयंती च्या शुभेच्छा
दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सृष्टीचे सर्जन,
अनोखे दर्शन,
त्रिमूर्तीस वंदन
गुरुदेव दत्त!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दत्त जयंतीचा मंगलमय दिवस आज तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येवो हीच शुभकामना!
यंदा दत्त जयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा 7 डिसेंबर दिवशी सकाळी 8.01 वाजता सुरू होणार आहे तर समाप्ती सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, असे मानले जाते आणि त्यानुसार त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो.