
Datta Jayanti Messages in Marathi: मृग नक्षत्रात मार्गशीष पौर्णिमेच्या संध्याकाळी दत्तगुरुंचा जन्म झाला. म्हणुन दरवर्षी दत्तक्षेत्रांत मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केल्या जाते. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. भगवान दत्ताचा जन्मला दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास मनातल्या मनोकामना पुर्ण होतात. दत्त जयंतीच्या सात दिवसपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या मनोभावाने साजरा केला जातो. तरी दत्त जयंती निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विशेष डिजीटल मेसेजे घेवून आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या वॉलपेपर, कोट्स, स्टेटस, इमेजेसच्या माध्य़मातून शेअर करु शकता.
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Datta Jayanti Messages)

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवितो जो जगण्याचा सार
तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही
कसा करावा भवसागर पार
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!