Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त खास WhatsApp Status, Wallpapers, Messages द्वारे करा अभिवादन

छत्रपती संभाजी राजे 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले, परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज हे शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त खास WhatsApp Status, Wallpapers, Messages द्वारे करा अभिवादन
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes in Marathi: मराठा साम्राज्याचे संस्थापक सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी, छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Maharaj)  यांचा छत्रपती म्हणून 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला. छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता. छत्रपती संभाजी 2 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले.

वयाच्या नवव्या वर्षी त्यांना 5 हजारांची मनसबदारी मिळाली होती. तर संभाजी महाराज केवळ 9 वर्षाचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा येथे नेले होते. छत्रपती संभाजी राजे वयाच्या 18 व्या वर्षी युवराज झाले. त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी ते छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

तर, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत खास Wishes, WhatsApp Status, Quotes, Wallpapers, Messages द्वारे त्यांना अभिवादन करा. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व)

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले, परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज हे शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ तर इतर भाषेतील तीन ग्रंथ संभाजी राजांनी 15 व्या वर्षीच लिहले. तर अशा या राजाला त्याच्या राज्याभिषेक दिनामित्त्र त्रिवार वंदन.

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2025 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).