Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 Messages: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भारतातील शूर योद्ध्यांच्या साखळीतील सर्वात आदरणीय नाव आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये आजारपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या राजधानीच्या डोंगरी किल्ल्या राजगड येथे मृत्यू झाला. या महान शासकाच्या युद्धकौशल्य आणि जीवनातून लोक आजही प्रेरणा घेतात.
शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेल्या वीर शिवाजी महाराजांची गौरवगाथा आजही लोकांना सांगितली जाते. वीर छत्रपती शिवाजी यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त Images, Whatsapp Status, SMS द्वारे करा अभिवादन.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीस शिवरायांस मानाचा मुजरा!
रयतेसाठी झटला तो,
स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी प्रणाम
भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
अशा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!
एक विचार समानतेचा
एक विचार नीतीचा
ना धर्माचा ना जातीचा
राजा माझा फक्त मातीचा
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस मानाचा मुजरा!
शिवाजी महाराज हे अशा मोजक्या राज्यकर्त्यांपैकी एक आहेत. ज्यांच्याकडे व्यावसायिक सैन्य होते. त्यांनी मजबूत नौदलही तयार केले होते. त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज तुळजा भवानीचे उपासक होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात असे म्हटले जाते की, माता भवानीने स्वतः त्यांना दर्शन दिले आणि भेट म्हणून तलवार देखील दिली. या दंतकथेमागे शिवरायांचे शौर्य आणि युद्धकौशल्य यांच्याशी निगडीत समजुती आहेत.