चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

Eid Mubarak 2020 : रमजान ईद हा मुस्लिम बांधवांसाठीचा मोठा उत्साहाचा दिवस. जगभरात आता लोकांना येत्या रमजान ईदची (Ramzan Eid)  उत्सुकता आहे. भारतामध्ये 24-25 मे दिवशी ही ईद सेलिब्रेट केली जाणार आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, पाक महिना रमजान येत्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. त्यानंतर इस्लामिक कॅलेंडरचा 10 वा महिना शव्वालची सुरूवात होईल. जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद आणि ईद-उल-फितर (Eid-ul-Fitr) चा आनंद सोहळा धुमधडाक्यामध्ये साजरा करतात. नमाज अदा करत एकमेकांना गळाभेट देत, ईदी पासून भेटवस्तू आणि अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी शव्वाल चांद पाहिला जातो. चंद्रकोर दिसल्यानंतर मुस्लिम बांधव आनंदाने एकमेकांची गळाभेट घेत मित्र परिवार, नातेवाईक, प्रियजनांना चांद रात मुबारकच्या शुभेच्छा देतात. यंदा रमजान ईद वर कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यामुळे बाहेर पडून तुम्हांला शुभेच्छा देणं शक्य नसलं तरीही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चांद रात मुबारकच्या शुभेच्छा विशेज, इमेजेस, फेसबुक ग्रीटिंग्स, जीआईएफ (GIFs), एचडी फोटोज, वॉट्सऐप स्टेटस, वॉलपेपर्स यांच्यामाध्यमातून देऊन आनंद द्विगुणित करू शकता. Ramadan Eid 2020 Wishes: रमजान ईद निमित्त संदेश, SMS, Messages, Images, GIF's च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करुन साजरा करा या पवित्र सणाचा आनंद!

रमजान ईद म्हटली नवे कपडे, शिर कुर्मा ते मालपोवा सारख्या एक ना अनेक गोडा धोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. यंदा हा सारा सण घरच्या घरी करायचा आहे. पण आज संध्याकाळी शव्वाल महिन्याचा चांद पाहून भारतामध्ये नेमकी ईद कधी साजरी होणार? याचं उत्तर हिलाल कमिटीकडून दिलं जाणार आहे. मग तुमच्या आयुष्यातील प्रिय लोकांना या चंद्राच्या दर्शनाच्या शुभेच्छा द्या.

चांद मुबारक शुभेच्छा

 

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)
चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

via GIPHY

चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)
चांद रात मुबारक 2020 (Photo Credits: File Image)

इस्लाम धर्माच्या मान्यतानुसार, रमजान महिन्यात अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडतो. रोजा ठेवणार्‍या प्रत्येकाची इच्च्छा कबुल करतो. दरम्यान महिन्याभराच्या या काळात अल्लाहची इबादत करून गुन्हांची कबुली देऊन माफी मागितली जाते. रमजान महिन्यात कुराण पढण करणं, 5 वेळेस नमाज अदा करणं याला महत्त्व असते.