Dussehra 2023 Messages In Sanskrit: दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. रावण दहनासोबतच या दिवशी दुर्गा माँच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते. दसरा हा हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण आहे जो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भगवान रामाने रावणावर जिंकल्याबद्दल साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे फटाक्यांची आतषबाजी करून दुष्टाचा नाश केला जातो.
वाल्मिकी रामायणानुसार, भगवान रामाने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवीची पूजा केली. यानंतर दशमी तिथीला त्यांनी रावणाचा वध केला. यासाठी दरवर्षी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, महिषासुर आणि माँ दुर्गा यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला. या कारणास्तव, विजयादशमी विजयाचे प्रतीक म्हणून अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरी केली जाते. दसऱ्यानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास संस्कृतमधील Images, Quotes, Wishes, Greetings शेअर करून शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास संस्कृत मेसेज खाली दिले आहेत.
देवी दुर्गा भवतः सर्वान् कामनाः प्रदातु, सुस्वास्थ्य, सफलता, सुखस्य च आशीर्वादं ददातु।
जय श्री राम। दशहरा हार्दिक शुभकामना!
भगवान् रामः भवन्तं बलेन साहसेन च सद्धर्मस्य मार्गं अनुसृत्य आशीर्वादं ददातु।
आनन्दमय विजयादशमी हेतु शुभकामनाएं !
रावणस्य ज्वलन्तप्रतिमायाः साक्षिणः भवन्तः
स्मर्यतां यत् भवतः सर्वाणि
चिन्तानि चिन्ताश्च तेन सह दह्यन्ते,
भवतः जीवने भवतः परितः च सुखस्य,
उत्साहस्य च मार्गं प्रशस्तं करिष्यन्ति।
भवतः परिवाराय च दशहरायाः अतीव शुभकामना।
एषः दशहराः पृथिव्यां सर्वान् विषादं दुःखं च दहतु,
भवतः सुखं समृद्धिं च जनयतु।
विजयदशमी की हार्दिक शुभकामनाएं !
भगवान् रामः भवतः सफलतायाः मार्गं
प्रकाशयन् एव भवतु,
जीवनस्य प्रत्येकस्मिन् चरणे भवतः विजयः भवतु।
जय श्री राम। दशहरा हार्दिक शुभकामना!
हिंदू धर्मात विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने देण्याची प्रथा आहे. या पानांना दसऱ्याच्या दिवशी सोन्याप्रमाणे महत्त्व दिलं जातं. वयाने लहान असलेले तरुण-तरुणी वडिलधाऱ्यांना आपट्याची पानं देतात. शतकानुशतके चालत आलेली ही जुनी परंपरा आहे. क्षत्रियांमध्ये या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महाभारतातील युद्धादरम्यान पांडवांनी शमीच्या झाडावर शस्त्रे लपवून ठेवली आणि त्यांना कौरवांवर विजय मिळाला.