
Karwa Chauth 2024 Wishes: विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वर्षभर अनेक उपवास करतात, ज्यामध्ये करवा चौथ (Karwa Chauth 2024) एक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला, विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, यावर्षी करवा चौथचा उपवास 20 ऑक्टोबर 2024 रोजी केला जात आहे. या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जल उपवास करतात, नंतर वस्त्र परिधान करून, सोळा शृंगार करून विधीनुसार पूजा करतात. या काळात करवा चौथची कथा ऐकली किंवा वाचली जाते, त्यानंतर रात्री चंद्रोदयानंतर स्त्रिया चंद्राला पाहून उपवास पूर्ण करतात.
असे मानले जाते की, हे व्रत पाळल्याने महिलांना अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो. करवा चौथचे व्रत पाळण्याआधी स्त्रिया सूर्योदयापूर्वी उठतात आणि सरगी खातात, त्यानंतर हे व्रत सुरू होते. या सणाला स्त्रिया हातावर मेहंदी लावतात आणि सोळा शृंगार करतात. करवा चौथ निमित्त तुम्ही शुभेच्छा संदेश पाठवू शकता. या विशेष प्रसंगी, तुम्ही या अप्रतिम हिंदी शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्स पाठवून करवा चौथच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.
सात जन्म का साथ मिले,
ऐसा जीवन मुझे खास मिले,
ना हो कोई ख्वाइश मेरी,
बस जब तुझे याद कंरू,
तू मेरे पास मिले.
करवा चौथ की शुभकामनाएं

चांद में दिखती है,
मुझे मेरे पिया की सूरत,
चांद संग चांदनी सी है,
मुझे भी उनकी जरूरत.
करवा चौथ की शुभकामनाएं

हमें आपकी एक झलक मिल जाए,
तो ये व्रत सफल हो जाए,
हम बैठे हैं आपके इंतजार में,
आप आएं तो यह व्रत पूरा हो जाए.
करवा चौथ की शुभकामनाएं

व्रत रखा है मैंने,
बस एक प्यारी सी ख्वाहिश के साथ,
हो लंबी उम्र तुम्हारी और,
हर जन्म मिले हमें एक-दूसरे का साथ.
करवा चौथ की शुभकामनाएं

सुख-दुःख में हम-तुम,
हर पल साथ निभाएंगे,
एक जन्म नहीं सातों जन्म,
पति-पत्नी बन आएंगे.
करवा चौथ की शुभकामनाएं

असे म्हटले जाते की जर विवाहित स्त्री लग्नानंतर प्रथमच करवा चौथ व्रत पाळत असेल तर ती पूजेसाठी तिचा विवाह पोशाख घालू शकते. करवा चौथच्या दिवशी सकाळी स्नान करून लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर संध्याकाळी नववधूप्रमाणे वेशभूषा करून विधीनुसार पूजा करावी. पूजा करताना करवा चौथ व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर चाळणीतून चंद्राकडे पाहावे आणि त्यानंतर पतीचे मुख पहावे. पतीचा चेहरा पाहिल्यानंतर त्याच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा आणि पाणी पिऊन उपवास सोडावा.