
Buddha Purnima Wishes in Marathi: भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima) बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी यंदा कोरोनामुळे सार्वजनिक पद्धतीने हा दिवस साजरा करता येणार नाही. मात्र सोशल मिडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Wishes, Greetings, Quotes, WhatsApp Status चा वापर करु शकता. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
लोकांमध्ये दया, क्षमा, शांतीचा प्रसार करणारे,
असत्याला सत्याने जिंकण्याची शिकवण देणारे
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा-
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या
आयुष्यातले दुःख नाहीसे करून
सुख शांती आणि समाधान घेऊन येवो
हिच ईश्वरचरणी प्रार्थना
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जगात पसरलेला अंध:कार
नाहीसा करण्यासाठी सोडले ज्यांनी घरदार
बुद्ध पौर्णिमा साजरी करुन
सर्वांनी हात जोडूनि मानूया त्यांचे आभार
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.