Buddha Jayanti 2020: आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंतीचा सोहळा! भगवान गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांनी जगाला शांती,दया, क्षमा, संयम याची शिकवण दिली. दरवर्षी गौतम बुद्ध यांच्या जयंती (Buddha Jayanti) निमित्त वैशाख पौर्णिमेला बौद्ध बांधव बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) साजरी करतात. वैशाख पौर्णिमेदिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म आणि निर्वाण झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे हा दिवस गौतम बुद्धांच्या अनुयायींसाठी खास असतो. गौतम बुद्ध हे प्रतिभावान व्यक्तिमत्त्व होतं. आज 21 व्या शतकामध्येही त्यांचे विचार अनेकांना कठीण काळात आत्मविश्वास, सकारत्मकता देण्यासाठी मदत करतात. सामान्यांप्रमाणेच ओशो (Osho), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar), बहिणाबाई, संत नामदेव यांच्यापासून ते अगदी फेसबूक सारख्या कंपनीचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवणार्यांपैकी एक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणीचा भारताप्रमाणेच चीन, कोरिया, नेपाळ अशा आशिया खंडातील इतर देशांमध्येही प्रसार आणि प्रभाव पहायला मिळतो. मग यंदा बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून गौतम बुद्धांबद्दल थोरा-मोठांनी व्यक्त केलेली मतं देखील जाणून घ्या. Happy Buddha Purnima 2020 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings, GIFs, HD Images च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरा करा यंदा गौतम बुद्धांचा जन्मदिवस!
गौतम बुद्ध यांच्याबद्दल थोरा-मोठ्यांनी व्यक्त केलेली मत
गौतम बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव जगाने किंवा भारताने आजपर्यंत निर्माण केला नाही.
— ओशो (रजनीश)
हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर.
— तुकडोजी महाराज
“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरुष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वतःचे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”
— स्वामी विवेकानंद
कलियुगी हरी बुद्धरूपधरी ।
तुकोबा शरीरी प्रवेशला ।।
— संत बहिणाबाई
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Buddha Purnima 2020 कशी झाली बुद्ध पौर्णिमेची सुरवात काय आहे या पौर्णिमेच महत्व जाणून घ्या - Watch Video
गौतम बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सामान्यांपर्यंत पोहचवले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्यं, अष्टांग मार्ग व पंचशीले जगाला दिली आहेत. भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो.