
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B R Ambedkar) यांचा जन्मदिवस भीम जयंती म्हणून साजरी केली जाते. 14 एप्रिल हा भीम जयंतीचा (Bhim Jayanti ) दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याअनिमित्ताने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येऊन डॉ. आंबेडकरांना आपली आदरांजली अर्पण करतात. तुम्ही देखील सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Photos, Images शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
1928 पासून आंबेडकर जयंती साजरी करण्यास सुरूवात झाली. भीम जयंती साजरी करण्याची सुरूवात 1928 साली जनार्दन रणपिसे यांनी केली. समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे.
भीम जयंतीच्या शुभेच्छा





डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. दलित, अस्पृश्य समाजातील लोकांना त्यांचे न्याय वा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भरीव काम केले आहे. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे.