Best Eid Al-Fitr 2020 Gifts: जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी मोठा आनंदाचा असणारा रमजान ईदचा (Ramadan Eid) सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 24-25 मे दिवशी ईद साजरी केली जाणार आहे. चंद्र कोर पाहून चांद रात ठरवली जाते त्यामुळे जगभरात वेगवेगळ्या दिवशी ईद (Eid) साजरी केली जाईल. पण सार्यांमध्ये उत्साह सारखाच असतो. रमजान ईद म्हटली की नवे कपडे, शिर कुर्मा ते आबालवृद्धांना आकर्षण असणारा एक रीत म्हणजे 'ईदी'(Eidi). प्रियजनांना एखाद्या भेटवस्तूच्या माध्यमातून ईदी दिली जाते. पण यंदा सर्वत्र कोरोना व्हायरसचं संकट असल्याने भारताप्रमाणेच परदेशातही अनेक ठिकाणी ईद घरातच राहून किंवा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रियजणांना यंदा ईदी देखील व्हर्च्युअल जगातच द्यावी लागणार आहे. यंदा तुम्हांला ऑनलाईन जगात आणि ऑनलाईन माध्यमातून हा सण साजरा करावा लागणार आहे. Simple Mehndi Designs For Eid 2020: रमजान ईद च्या निमित्ताने यंदा हाता-पायावर झटपट मेहंदी काढण्यासाठी आयडिया देतील हे लेटेस्ट ट्रेन्डस (Watch Videos).
यंदा ऑनलाईन माध्यमात ईदी देण्याचे पर्याय कोणते?
ऑनलाईन गिफ्ट कार्ड्स
तुमच्या तुमच्या प्रिय व्यक्तीची आवड निवड पक्की ठाऊक असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी ऑनलाईन गिफ्ट कार्ड्स घेऊ शकतात. साधारण वर्षभर व्हॅलिडिटी असणारी ऑनलाईन गिफ्ट कार्ड्स निवडा म्हणजे ते हे कोरोनाचं संकट संपलं तरीही शॉपिंग करू शकतात.
ऑनलाईन ईदी
डिजटल मनी किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या माध्यमातून तुम्ही सहज पैशांच्या स्वरूपात ईदी देऊ शकता. गूगल पे, पेटीएम सारखी अनेक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणारी अॅप उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदा थेट भेटून हातात पैसे देण्याऐवजी ऑनलाईन पैसे दिले जातील.
घरगुती वस्तू
तुमच्या घरातच तुमच्या प्रिय व्यक्ती असतील आणि त्यांना तुम्हांला ईदी द्यायची असेल तर त्यांच्यासाठी घरच्या घरी काही वस्तू बनवा. स्वतः केलेल्या वस्तूंचे मोल नसते.
रमजान ईद म्हटली की खाण्याची चंगळ असते. बिर्याणी, शाही तुकडा, शेवय्या यांचा बेत नक्की असतो. यंदा तुमच्या सार्या मित्रमंडळींसोबत, कुटुंबासोबत तुम्हांला ईद साजरी करता आली नसली तरीही तुम्ही घरच्या घरी काही मोजक्याच लोकांसोबत हा आनंदाचा सण नक्की साजरा करा.