Balika Din | File Image

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 3 जानेवारी हा त्यांच्या जयंतीचा दिवस 'बालिका दिवस' (Balika Din) म्हणून देखील साजरा केला जातो. महाराष्ट्रात बालिका दिवसाच्या निमित्ताने 3 जानेवारीला अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सावित्रीबाईंमुळे अनेकींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असल्याने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या बालिका दिवसाचं विशेष महत्त्व आहे. मग आज तुमच्या घरातील सार्‍या चिमुरडींना या बालिका दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा आजचा दिवस थोडा खास करण्यासाठी WhatsApp Status, Wishes, Quotes, Facebook Messages शेअर करायला विसरू नका.

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1955 पासुन 3 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. पती जोतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचा वसा हाती घेतला. त्यांना मुली, स्त्रिया यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाचा मोठा रोष देखील पत्कारावा लागला. मात्र प्रतिकूल स्थितीवर फुले कुटुंबाने मात करत शिक्षणाचा प्रसार केला. Savitribai Phule Jayanti 2025 Messages: स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा.

बालिका दिवसाच्या शुभेच्छा

Balika Din | File Image
Balika Din | File Image
Balika Din | File Image
Balika Din | File Image
Balika Din | File Image

 

आज कित्येक मुली, महिला केवळ सावित्रीबाईंच्या प्रयत्नांमुळे चूल आणि मूल च्या संकल्पनेमधून बाहेर पडून मोठी भरारी घेऊ शकल्या आहे. अनेकींना शिक्षण घेण्याचा आणि स्वावलंबी बनण्याचा अनुभव केवळ सावित्रिबाईंमुळे मिळू शकला आहे. म्हणूनच आज (3 जानेवारी) त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना स्मरून आदरांजली नक्की अर्पण करा.