Savitribai Phule Jayanti 2025 Messages in Marathi: सध्या भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मुख्यत्वे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मात्र त्यावेळी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज भारतामधील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारतामधील महिला विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या, 3 जानेवारी रोजी जयंती (Savitribai Phule Jayanti 2025). त्या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणूनही साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांना प्रथम स्वतःसाठी शिक्षणासाठी खूप संघर्ष कारवां लागला. नंतर त्यांनी इतर मुलींनाही शिक्षणासाठी मदत केली. सावित्रीबाई फुले यांच्याशिवाय देशाच्या शिक्षणाची आणि सामाजिक उन्नतीची बाब अपूर्ण आहे.
तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त खास Messages, Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा!
(हेही वाचा: Makar Sankranti 2025 Date: यंदा मकर संक्रांती कधी आहे? काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि पूजाविधी? जाणून घ्या)
दरम्यान, महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी 1848 ते 1851 दरम्यान अठरा शाळा स्थापन केल्या. 17 फेब्रुवारी 1852 रोजी पहिली-वहिली वार्षिक शालेय परीक्षा घेण्यात आली. अशाप्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि विधवांसाठी मदत, इतर मानवतावादी सेवांबरोबरच, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी यथोचित सेवा केली.