Bail Pola 2023 Wishes in Marathi: बैलपोळा सणानिमित्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा! Wishes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून सर्जा-राजाबद्दल व्यक्त करा कृतज्ञता

Happy Bail Pola Wishes 2023: कृषीप्रधान भारतातील बळीराजाचा सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अनेक सणांपैकी एक म्हणजे बैलपोळा (Bail Pola 2023 Images). वर्षातून एकदाच येणारा हा सण. ज्याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिलेले असते. अर्थात हा सण बळीराजा म्हणून ओळखला जात असला तरी खऱ्या अर्थाने तो त्याच्यासोबत शेतामळ्यात राबणाऱ्या सर्जा-राजा म्हणजेच बैलाचा आहे. बैलांना मानवी भाव-भावना नसल्या तरी त्याच्या प्रति असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पूर्वी शेती अवजारामध्ये यांत्रिकीकरण फारसे घुसले नव्हते. त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. अलिकडील काळात मात्र यंत्रवत शेती केली जात असल्याने बैलांवर आधारीत पारंपरीक शेती काहीशी कमी होत चालली आहे. असे असले तरी आजच्या डिजिलट युगात Greetings, Wallpapers, Wishes, Messages आदींच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण आपण नक्कीच साजरा करु शकता. त्यासाठी येथे दिलेल्या इमेजेस आपण नक्की शेअर करु शकता.

यंदाच्या वर्षी हिंदू पंचागांनुसार 14 तारखेपासून पहाटे 4.50 मिनीटांनी श्रावण अमावस्या सुरु होत आहे आणि 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.15 वाजता संपत आहे. या दरम्यानच बैलपोळा आहे. जो गुरुवारी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आहे. आपणही आपली मूळं खेडा-पाड्यांमध्ये शोधत असाल तर नक्की आपल्याला बैळपोळ्याचे महत्त्व माहिती असेल. त्यामुळे या दिवशी आपणही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकाल.

Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi

बैलपोळा सणाचे वैशिष्ट असे की हा सणही देशातील विविधतेचे प्रतिनिधीत्व करतो. ज्यामध्ये सण साजरा करण्याची भावना सारखी असली तरी, त्याची परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा अनेकदा भिन्न असल्याचे पाहायला मिळते. जसे की, काही भागात हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा होतो. महाराष्ट्रातही हा सण अशाच पद्धतीने साजरा होतो. ज्यामध्ये बैलपोळा साजरा करण्यासाठी प्रदेशपरत्वे विविधता आणि वेगळेपणही पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय सण आणि उत्सवांमध्ये नेहमीच विविधता आढळते. तसेच हे सण साजरे करताना त्यात विविधताही आढळते.

Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi

बैलपोळा सण थोडक्यात

शेतकरी वर्गात बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण आहे. ज्यामध्ये बैलांप्रती विशेष कृतज्ञता दर्शवली जाते. त्यांना एक दिवस औतापासून विश्रांती दिली जाते. त्यांना हिरवा चारा घातला जातो. इतकेच नव्हे तर त्यांना अंघोळ घालून त्यांची हळदी कुंकवाने पूजा केली जाते. त्यांना गोडाधोडाचा नैव्यद्यही चारला जातो. शिवाय त्यांचे खांदे तेलाने, तूपाने मळले जातात. त्यांच्या अंगावर छान झूल, गळ्यात चाळ आणि शिंगांना शेंब्या घातल्या जातात. गळ्यात कवड्यांची माळ, कंडा, म्होरकी घातली जाते. इतकेच नव्हे तर नवी वेसण, कासरेही नवे घेतले जातात. हा दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस मानला जातो.