Ashadhi Ekadashi 2020 Date, Muhurat and Vrat: यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) म्हणजेच देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) 1 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहेआषाढी एकादशीची वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा. यंदा कोरोना व्हायरसच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्र राज्यात पायी वारी रद्द करून घरच्या घरीच हरिपाठ, नामस्मरण, भजन, कीर्तन करून हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. वारकरी मंडळींसाठी आषाढी एकादशी पासूनच पुढील चार महिने चातुर्मास (Chaturmas) काळ सुरू होतो. या काळात महाराष्ट्रातील अनेक घराघरात मांसाहारासोबतच कांदा-लसूण देखील आहारात व्यर्ज केले जाते. मग जाणून घ्या यंदा आषाढी एकादशी व्रत सोबतच चातुर्मास कधी पासून सुरू होतोय? या चातुर्मासाची सांगता कधी होणार? आणि घरच्या घरी तुम्ही विठू माऊलीच्या आराधनेसाठी आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर तो कधी आहे?Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशी निमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे द्या शुभेच्छा!
आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला दक्षिणायन सुरू होते. आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात. यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात. Pandharpur Wari 2020: देहू मधून आज संत तुकाराम महाराज तर पैठण मधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; कोरोनामुळे पायी वारी रद्द.
आषाढी एकादशी व्रत तारीख आणि वेळ
- आषाढी एकादशी तारीख : 1 जुलै 2020
- आषाढी एकादशी तिथी आरंभ: 07:49 PM (30 जूनच्या रात्री)
- आषाढी एकादशी तिथी समाप्ती: 05:29 PM (1 जुलैच्या संध्याकाळी)
द्रिक पंचांगच्या माहितीनुसार, तर 2 जुलै दिवशी पारायणाची वेळ सकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत आहे.
चातुर्मास कधी सुरू होणार आणि कधी संपणार?
आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरूवात होते. यंदा चातुर्मास 1 जुलै पासून सुरू होणार आहे तर त्याची सांगता 26 नोव्हेंबर दिवशी देवउठनी एकादशी दिवशी होणार आहे. हा चातुर्मास बौद्ध आणि जैन बांधवांसाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो.
दरम्याम महाराष्ट्रात आषाढी एकादशी दिवशी व्रत, उपवास करण्याची प्रथा आहे. वारकर्यांसोबतच सामान्य विठू माऊलीचे भक्त देखील हे एका दिवसाचे व्रत पाळून आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करतात. यादिवशी केवळ फलाहार आणि दूध पिऊन विठठल-रूक्मिणीची आराधना केली जाते. महाराष्ट्रात पंढरपुर मधील विठ्ठल-रूक्मिणीच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.