Army Day 2021 Date, History & Significance:  15 जानेवारी रोजी सेना दिवस का साजरा करतात ? जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती
Photo Credit: ANI Twitter Video Grab
Indian Army Day 2021: सैन्य हे देशाचे खरे रक्षक आहेत, ते सीमेवर जागरुक रक्षकांसारखे तैनात आहेत म्हणूनच आपण इथे शांतपणे जगू शकतो. बर्फाच्छ ठिकाणी एवढ्या थंडीत आपल्या परिवारापासून लांब राहून ते आपले रक्षण करत असतात म्हणून आपण आपलायला घरी शांत झोपू शकतो. राष्ट्राची सुरक्षा, अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी भारतीय सशस्त्र सेना आणि शहादत यांचे महत्त्व काही शब्दांत सांगता येत नाही.भारतीय सैन्य  15 जानेवारी रोजी 73 वाभारतीय सेना दिवस साजरा करीत आहे. 15 जानेवारीलाच हा सण का आणि कसा साजरा करावा हे जाणून घेऊया. (Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव )
  15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस का साजरा करतात ?
15 ऑगस्ट 1947 रोजी, जेव्हा भारत ब्रिटीशांच्या राजवटीपासून स्वतंत्र झाला, तेव्हा देशभरातील दंगली व शरणार्थींनी बर्‍याच प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्याला पुढे यावे लागले. पण तोपर्यंत सैन्याची कमान ब्रिटीश कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होती.  15 जानेवारी 1949 बुचरने सैन्याची कमान फील्ड मार्शल कोडानडेरा मडप्पा करियप्पा यांच्याकडे दिली. अशा प्रकारे करियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले सैन्य प्रमुख बनले. भारतीय सैन्यातील शौर्य आणि शहादत यांना योग्य आदर देण्यासाठी भारत सरकारने 'आर्मी डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच 15 जानेवारी. त्यानंतर दरवर्षी हा दिवस आर्मी डे म्हणून साजरा केला जात आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करिअप्पा यांच्यावर दोन्ही देशांत सेनेची विभागणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. करिअप्पा 1953 मध्ये सेनेतून निवृत्त झाले. सैन्यात असताना त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे ते एक महान सैनिक ठरले.

निवृत्तीनंतर कर्नाटकमध्ये करिअप्पा राहू लागले. दरम्यान 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळेस त्यांचा मुलगा के. सी. नंदा करिअप्पा भारतीय वायुसेनेत फ्लाईट लेफ्टिनेंट होता. युद्ध काळात त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आणि पाक सैनिकांना कंठस्नान घातले. नंदा यांनी विमानातून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला पण पाक सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले.

कसा साजरा करतात हा दिवस ?
कोणत्याही सामान्य भारतीयांसाठी 'आर्मी डे' राष्ट्रीय सणापेक्षा कमी म्हटले जाऊ शकत नाही. या खास निमित्ताने नवी दिल्लीतील 15 करियप्पा परेड मैदानावर सैन्य दलातून परेड काढली जाते. भारतीय सैन्याच्या तुकडी सैन्यप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देतात. यानंतर भारतीय लष्कराच्या म्युझिक बँडने त्यांचे सादरीकरण केले जाते.