दरवर्षी, 15 जानेवारी रोजी देशात आर्मी डे (Army Day) साजरा केला जातो. याच दिवशी 1949 मध्ये फील्ड मार्शल केएम करियप्पा (Field Marshal KM Cariappa) यांनी जनरल फ्रान्सिस बुचर (General Sir Francis Butcher) यांच्याकडून भारतीय सैन्याची कमांड आपल्या हाती घेतली होती. जनरल फ्रान्सिस बुचर भारताचा शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ होता. 15 जानेवारी रोजी फील्ड मार्शल केम करियप्पा हे इंडियन आर्मीचे पहिले कमांडर इन चीफ बनले होते. इंडियन आर्मी यंदा आपला 72 वा आर्मी डे साजरा करेल.
या दिवशी भारतीय सैन्य आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवते. या दिवशी दिल्ली येथे खास परेड आयोजित केली जाते. 'आर्मी डे' च्या संध्याकाळी आर्मी चीफ चहा पार्टी आयोजित करतात, ज्यामध्ये तीन सैन्यांच्या सर्वोच्च कमांडरसह भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा समावेश असतो. या दिवशी दिल्लीच्या इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. तसेच शहीदांच्या विधवा पत्नींना सैन्य पदके व इतर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यावेळी आर्मी डे परेड थोडी खास असणार आहे. चौथ्या पिढीतील तानिया शेरगिल नावाची महिला अधिकारी 15 जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे नेतृत्व करणार आहे.
दरम्यान, ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यापासून भारतीय सैन्याची सुरुवात झाली. त्यानंतर ते ब्रिटीश भारतीय सैन्य बनले आणि नंतर विद्यमान भारतीय सेना बनली. या सेनेने जगभरातील अनेक लढाया आणि मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतीय सैन्याने आतापर्यंत शेजारच्या पाकिस्तानसोबत चार आणि चीनबरोबर एक युद्ध केले आहे.
भारतीय सैन्याची एक तुकडी संयुक्त राष्ट्रांना मदत करण्यासाठी नेहमीच समर्पित असते. त्याअंतर्गत भारतीय लष्कर अंगोला, कंबोडिया, सायप्रस, कांगो, अल साल्वाडोर, नामीबिया, लेबनॉन, लाइबेरिया, मोझांबिक, रवांडा, सोमालिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम येथे गेले आहे. कोरियातील युद्धाच्या वेळी जखमी आणि आजारी लोकांना सुरक्षित घेऊन येण्यासाठी भारतीय सैन्याने आपले अर्धसैनिक दलही उपलब्ध करून दिले आहे. (हेही वाचा: भारत-पाकिस्तान तुलनेत कोणाची सैन्य शक्ती किती? जाणून घ्या)
Army Day 2020: 15 जानेवारीला साजरा केला जातो सैन्य दिवस; जाणून घ्या कारण आणि वैशिष्ट्ये Watch Video
भौगोलिकदृष्ट्या, भारतीय सेना सात कमांडमध्ये विभागली गेली आहे, ज्यांची मुख्यालये देशाच्या विविध भागांत आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्थायी सेना आहे. तसेच जगातील सर्वात आधुनिक सैन्यांपैकी एक आहे. भारतीय सेना ही जगातील तिसरी मोठी सेना आहे. भारतीय सैन्यात अंदाजे 1, 129, 900 सक्रिय सैनिक आणि 960,000 राखीव सैनिक आहेत.