Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन श्रीगणेशा पुढे व्हा नतमस्तक!
Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. यंदा कोरोनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून आपण बाहेर मंदिरात जाण्यापेक्षा घरातील देवापुढे नतमस्तक व्हावे. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता.

गणेश भक्ती करण्यासाठी त्यामागची भावना महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही घरात राहून अगदी साग्रसंगीत गणेशाची आराधना करु शकता. तसेच Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता.

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

विघ्न विनाशक मोरया

संकटी रक्षी शरण तुला मी

गणपती बाप्पा मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थी दिवशी दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi (Photo Credits: File)

हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाराज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तापसिने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले व सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाईल.