Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थी दिवशी दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय
Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi 2021) (मंगळवार, 2 मार्च) दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. पुण्यातील (Pune) वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी संपन्न होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे. मात्र ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी सुरु राहणार आहे. तसंच अभिषेक किंवा इतर पूजाही ऑनलाईन पद्धतीने करण्याची सोय ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीचे ऑनलाईन दर्शन भाविक ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप किंवा युट्युब  माध्यमातून घेऊ शकतात. दरम्यान, ऑनलाईन दर्शन 24 तास उपलब्ध असून भाविकांनी जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी लिंक्स:

 https://www.dagdushethganpati.com/live-darshan-01/

https://apps.apple.com/in/app/shreemant-dagdusheth-ganpati/id1241587046

https://www.youtube.com/channel/UCFUYpQptYcTT_IKWf2GlESg

ऑनलाईन अभिषेक किंवा इतर पूजा विधींसाठी नोंदणी येथे करावी-

https://seva.dagdushethganpati.com/seva_detail?eseva_id=NjU=&fbclid=IwAR2ovUGDDWV70L5-sLnltFYVrn73Ue9xHpysH5ArDqvwhnHjTo19HdbdTSU

अंगारकी चतुर्थी दिवशी सुमारे 3-4 लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी भाविकांसाठी मंदिरं बंद ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, कोविड-19 च्या नियमांचे पालन करुनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तसंच भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्वीकारणंही बंद केलं आहे.

दरम्यान, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही अंगारकी चतुर्थी दिवशी बंद राहणार असून भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.