Anganewadi Jatra 2022 Special Train: भराडी देवीच्या दर्शनाला जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे कडून आंगणवाडी यात्रेच्या काळात चालवल्या जाणार स्पेशल ट्रेन; पहा वेळापत्रक
रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोकणातील भराडी देवीची यात्रा (Bharadi Devi Yatra) यंदा 24 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. कोकणवासियांसाठी खास असलेल्या या यात्रेला यंदा कोरोना संकट निवळत असल्याने कोविड 19 नियमावलीचं पालन करत भाविकांना दर्शन घेण्यासाठी मुभा असेल. पण मुंबई, पुण्यामध्ये पसरलेल्या चाकरमान्यांना कोकणात दाखल होण्यासाठी रेल्वे कडून विशेष ट्रेनच्या फेर्‍या देखील चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवर होळी (Holi) आणि आंगणेवाडीची जत्रा (Anganewadi Jatra) या निमित्त 10 विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलेले आहे.

दरम्यान आंगणेवाडीची जत्रा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'आंगणे' गावातील गावकर्‍यांची असते. पण देवीच्या दर्शनाला मात्र सारे कोकणवासिय आवर्जुन येतात. मग यंदा तुमचाही जत्रेला जाण्याचा प्लॅन असेल तर वेळीच ट्रेनचं बुकिंग करा.

मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष दोन तर दादर-सावंतवाडी रोड विशेष आठ विशेष गाड्या चालवणार आहे. यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?

पहा वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या या स्पेशल ट्रेनचं 5 फेब्रुवारी 2022 पासून ऑनलाईन बुकिंग सुरू झालेले आहे. www.irctc.co.in या वेबसाईटवरून बुकिंग करता येऊ शकतं. दरम्यान या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना कोविड 19 नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे तसेच कंफर्म तिकीट असलेल्यांनाच आता रेल्वे प्रवास करता येणार आहे.