Anganewadi Jatra 2022 Date: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या मसुरे (Masure) आंगणेवाडीची यात्रा (Anganewadi Yatra) यंदा 24 फेब्रुवारी 2022 दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या (Bharadi Devi) दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 24 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडीची यात्रा मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस इतरांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. हे देखील वाचा: Anganewadi Jatra 2022 Special Train: भराडी देवीच्या दर्शनाला जाणार्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे कडून आंगणवाडी यात्रेच्या काळात चालवल्या जाणार स्पेशल ट्रेन; पहा वेळापत्रक
दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे पण अद्याप यंदाच्या जत्रोत्सवासाठी कोविड 19 नियमावली जाहीर झालेली नाही. सध्या राज्यातील ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता त्यावर काही निर्बंध लागण्याची दाट शक्यता आहे.हे देखील वाचा: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी.
आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.