Lord Ganesh (PC - Twitter)

Eco-friendly Lord Ganesha idol: सध्या राज्यात गणेश चतुर्थी उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील कारागीर गणेशाची पर्यावरणपूरक कागदी मूर्ती तयार करत आहेत. संपूर्णपणे इको-फ्रेंडली कागदापासून बनवलेली ही आकर्षक मूर्ती 18-फूट-उंच आहे. एल्फिन्स्टन गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आयोजन समितीचे अध्यक्ष संकेत यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितलं की, गेल्या 34 वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि गेली दोन वर्षे आम्ही 18 ते 19 फूट उंचीची ही इको-फ्रेंडली मूर्ती तयार करत आहोत. आम्ही ही मूर्ती तयार करण्यासाठी 200 ते 250 किलोग्रॅम कागद वापरला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिने लागतात, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याबाबत गेल्या तीन ते चार वर्षांपासून चर्चा सुरू असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पीओपी मूर्तींच्या उंचीच्या निर्बंधांमुळे, आयोजक समितीने 18 फूट मूर्ती तयार करण्यासाठी पर्यायी पद्धती शोधण्याचा निर्णय घेतला. सखोल संशोधनानंतर, त्यांना असे आढळून आले की उंचीशी तडजोड न करता पर्यावरणपूरक कागदी मूर्ती तयार केल्या जाऊ शकतात. या कागदी मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर चार तासांत विरघळतात. (हेही वाचा - Best Sarvajanik Ganeshotsav Mandal Spardha 2023: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी मुदत संपण्यापूर्वी कुठे, कसा कराल अर्ज, घ्या जाणून)

गणेश चतुर्थी हिंदू कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते. शिव आणि पार्वतीचा पुत्र भगवान गणेश यांच्या जन्म या दिवशी झाल्याने हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. विनायक चतुर्थी किंवा गणेशोत्सव म्हणूनही ओळखल्या जाणार्‍या या उत्सवात लोक घरांमध्ये गणपतीच्या मातीच्या मूर्ती स्थापित करतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची वेगळीचं रेलचेल असते. दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता सार्वजनिक मिरवणुकीत संगीत आणि सामूहिक मंत्रोच्चाराने होते. त्यानंतर अनंत चतुर्दशीला नदी किंवा समुद्रासारख्या जवळच्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन होते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला सुरू होईल आणि 29 सप्टेंबरपर्यंत दहा दिवस चालेल.